ह. भ. प श्री. निलेश महाराज झेरगांवकर यांनी किर्तनपर प्रवचनाव्दारे बंद्यांना मार्गदर्शन


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वारकरी आचारसंहिता परीषद (महाराष्ट्र राज्य) यांचेवतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून पसायदानाच्या आकांक्षाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण करणारे किर्तनपर प्रवचन दि.२२.०७.२०२४ रोजी आयोजित करण्यात आले. त्यावेळी ह. भ. प श्री. निलेश महाराज झेरगांवकर यांनी किर्तनपर प्रवचनाव्दारे बंद्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

 

कारागृहातील चार भिंतीच्या आत बंदीस्त बंदीजनांच्या मनावर किर्तनाच्या अभिसिंचनाने मन परीवर्तन घडवुन त्यांच्या अंतरीच्या ज्ञानदीप प्रज्वलित होईल. बंदीजनांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल. सदर उपक्रम मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी यांनी कामकाज पाहीले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!