पिंपरी चिंचवड पोलीसांची पगार टोळी, दळवी टोळी, काळे टोळी या टोळयांवर “मोका अंतर्गत कारवाई “
आजिद इनामदार उपसंपादक 99604 16422
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे, मालाविरुध्दचे गुन्हे करणारे, विनयभंग करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील २५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १४८ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं ७५५/२०२४ भादंवि कलम. ३९४, ३४ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) सचिन साहेबराव पगार (टोळी प्रमुख) वय ३१ वर्षे रा. संतोषी माता नगर, एमआयडीसी सातपुर, शिंदे गल्ली गंगापुर गाव, नाशिक २) दिपक भगवान जाधव वय २६ वर्षे रा. कुशल सोनाली सोसायटी समोर, चाकण पुणे मुळ पत्ता मु.पो. पाथरी ता.जि. जळगाव ३) योगेश शिवाजी दाभाडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १० गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
२) भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं ३१८/२०२४ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, १४३, १४७,१४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) महा. पो. कायदा कलम ३७ (१) १३५ क्रि. लॉ. अॅमे. अॅक्ट कलम ३ व ७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) ओमकार मल्हारी दळवी (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे रा. वाघ यांच्या बिल्डींगमध्ये, राणजत्रा हॉटेल जवळ, चहोली फाटा, दिघी पुणे २) योगेश जगन्नाथ मुळे वय २१ वर्षे रा. मधुबन सोसायटी, देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे ३) गणेश कृष्णा गवारी वय १९ वर्षे रा. समता शाळेजवळ, दत्त मंदिर शेजारी, चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे ४) विजय विरेंद्र चव्हाण वय १९ वर्षे रा.हनुमान कॉलनी, मस्जीद जवळ सदगुरुनगर, भोसरी पुणे ५) सचिन ऊर्फ पिरप्पा जगन्नाथ येरे वय २० वर्षे रा. लांडगे यांची रुम सोनाली हॉटेल मागे, धावडे वस्ती, भोसरी पुणे ६) तेजस चंद्रकांत डोंगरे वय २२ वर्षे रा. गुरुदत्त कॉलनी, धावडे वस्ती, भोसरी पुणे. यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
३) पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं ४९५/२०२४ भादवि कलम ३०८, ३४१, ५०४, ५०६, ३४,आर्म अॅक्ट ४,२५ क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३,७ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे सुप्रिम राजु काळे (टोळी प्रमुख) वय २४ वर्षे रा. एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे २) अविनाश सुभाष पात्रे वय १९ वर्षे रा रा.एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे ३) विनायक
दयानंद क्षिरसागर वय २० वर्षे रा. एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे ३) सुरेश काटे रा.शंकरनगर, चिंचवड पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
वरील तीनही प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, महाळुंगे एमआयडीसी, पिंपरी, निगडी, गंगापुर, म्हसरुळ पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा घालणे, पळवुन नेवुन जबरी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनाची तोडफोड करणे, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे, बेकायदकशीर अग्निशस्त्रे व जिवघेणे हत्यारे जवळ बाळगणे, घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदिप डोईफोडे (गुन्हे), मा. पोलीस उप-आयुक्त बापु बांगर (परि-०२), मा. पोलीस उप-आयुक्त स्वप्ना गोरे मॅडम (परि-०१), मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विशाल हिरे (गुन्हे), यांच्या मार्गदशनाखाली वपोनि श्री. कन्हेया थोरात (हिंजवडी पोस्टे), वपोनि श्री. नितीन फटांगरे (भोसरी पोस्टे), वपोनि श्री. अशोक कडलक (पिंपरी पोस्टे) पोलीस निरीक्षक श्री. अनिल देवडे (पी.सी.बी गुन्हे शाखा), पोउपिन केंद्रे (भोसरी पोस्टे), पोना उभे (हिंजवडी पोस्टे), पोना ओंकार बंड, पोशि कौटेकर (पिंपरी पोस्टे), पोहवा सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

