फरासखाना तपास पथकाची उल्लेखनीय कामगीरी ! सोन्याचे दागिने चोरी करणारे पाच आरोपिंना मुदेमाला सह केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पी.एम.टी. बस मध्ये तसेच गणेश उत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेवुन, भावीकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीचा शोध घेवुन, त्यांना अटक करण्यावावत फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना व तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्यानंतर अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अमंलदार त्यांचे बातमीदारा मार्फत तपास करीत असतांना पोलीस अमंलदार गजानन सोनुने व प्रविण पासलकर यांचे गोपनीय बातमी वरुन, दिनांक ०८/१०/२०२४ रोजी सुर्या हॉस्पीटल समोरील पी.एम.टी. बसस्थानक, कसबा पेठ पुणे येथुन तपास पथकातील पोलीस स्टाफचे मदतीने पाठलाग करुन, आरोपी इसम नामे १) विकी कृष्णा माने, वय १९ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे २) राज कृष्णा माने, यय २३ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे ३) कृष्णा रमेश माने, वय ४४ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे मुंढवा पोलीस चौकी समोर मुंढवा पुणे ४) सुधीर नागनाथ जाधव, वय ४६ वर्षे, रा. साऊथ इंडियन हायस्कुल शास्त्रीनगर घर नं. ७६८, अंबरनाथ वेस्ट जि. ठाणे ५) संतोष शरण्णाप्पा जाधव, वय ४० वर्षे, धंदा विगारी रा. घुलेनगर लेन नं. २ वरद हॉस्पीटल समोर मांजरी वा पुणे यांना अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा व फरासखाना पोलीस स्टेशन कडील तीन गुन्हे असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणून १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळुन ७,३४,०६४/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्हयाचा तपास अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहे.

आरोपी यांची गुन्हा करण्याची पध्दत आरोपी गर्दी असलेल्या पी.एम.टी. बस मध्ये वसुन, ज्या महिलांचे हातात अगर गळ्यात सोन्याचे दागिने आहे. अशा महिलांना टारगेट करुन, त्यांना इतर चार साथीदार यांचे मदतीने चारही वाजुने नकळत घेरुन, यातील मुख्य आरोपी संतोष जाधव हा त्याचे जवळील लोखंडी कटरने दागिने कट करताच समोरली पी.एम.टी. स्टाफवर उतरुन, चोरलेले दागिने यातील सुधिर जाधव याचे मदतीने अंबरनाथ येथील सराफ इसमास, हॉस्पीटलचे कारण सांगुन गहाण ठेवणे, आणि मिळालेले पैसे सर्व मिळुन आप-आपसात वाटुन घेत असे. पोलीस पकडण्यासाठी आल्यानंतर त्यांचे काही कोड शब्दाचा वापर करुन, पळुन जात असे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी रेकॉर्ड वरील आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त श्री संदिपसिंह गिल, सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौज मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदिप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!