सिंहगड रोड परिसरात गाडी वेगाने नेल्याच्या कारणावरुन कोयत्याने वार करुन तरुणाचा निर्घण खून


पत्रकार :- राजशेखर जाधव पुणे शहर

सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तीन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना केवळ गाडी वेगाने नेली, या कारणावरुन घडली आहे..अक्षय मारुती किरवले (वय २०, रा. गणेशनगर, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गणेशनगरमध्ये .शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा एका स्वीट मार्टमध्ये काम करत होता. ही अल्पवयीन मुले व अक्षय एकाच वस्तीत राहतात. वेगाने गाडी नेल्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अक्षय याच्या घरासमोर तिघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षय याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!