लोणीकंद पोलीसांनी गोडावुनच्या भिंतीस छिद्र पाडुन केलेल्या घरफोडीची केली उकल


पत्रकार विक्रम मोरे 

लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २२/१०/२०२४ रोजी रात्रीच्या वेळी लोणीकंद येथील वुई फोर केबल्स प्रा लिमीटेड या कंपनीच्या गोडावुनचे लोखंडी शटर उचकटुन कॉपर वायरची घरफोडी झाल्याने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १००६/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४), ३३४ (१) ३०५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व पोलीस स्टाफ यांनी वाघोली पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. १०२२/२४, भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४), ३३४ (१) ३०५ या गुन्हयात अटक केलेल्या ०४ आरोपींचा ताबा घेवुन त्यांना दिनांक ०५/११/२०२४ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वर नमुद गुन्हयात अटक करुन त्यांची ०५ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली.

सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन यांनी पोलीस कोठडीतील नमुद आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रिक विश्लेषण करुन अशा प्रकारचे गुन्हे उघड कारण्याच्या सुचना तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व तपास पथक अंमलदार यांना दिल्या होत्या.

सदर गुन्हयाच्या तपासात तपास पथक अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व तपास पथकातील अंमलदार पोलीस शिपाई श्री पांडुरंग माने व पोलीस शिपाई श्री मल्हारी सपुरे यांनी मागील ३ महिन्यापुर्वी आळंदी फाटा, पेरणे येथिल इंडस कंपनीचे गोडावुनमधुन कॉपर वायर चोरी केलेल्या गुन्हयात प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाच्या आधारे ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींची ओळख पटविण्यात आली व सदर आरोपींचा गुन्हयात सहभाग असल्याचे निदर्शनास आले. तसेच पोलीस अंमलदार पोलीस नाईक अजित फरांदे यांनी नमुद आरोपींच्या मोबाइलचे कौशल्यपुर्ण केलेल्या तांत्रिक विश्लेषणा आधारे नमुद आरोपींनी घटनास्थळी येवुन घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असता आरोपीकडे केलेल्या तपासात नमुद आरोपींनी इंडस कंपनीचे गोडावुनच्या भिंतीस छिद्र पाडुन सदर कंपनीच्या गोडावुन मधुन किं. रु. ५,१७,५८६/- च्या कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली व सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशन, गुन्हा रजि क्र. ८२४/२४, भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४),३३४ (१) ३०५ हा गुन्हा असल्याने नमुद आरोपींना दिनांक ०८/११/२०२४ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपींची ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. नमुद आरोपींना मा न्यायालयात हजर करुन गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्यात येणार असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. हिमत जाधव साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर तसेच तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार सागर जगताप, कैलास साळुंके, अजित फरांदे, साईनाथ रोकडे, शुभम चिनके, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, सुधीर शिवले लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!