शेअर मार्केटमध्ये बनावट अॅपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणा-या ३ आरोपीना सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांचेकडुन अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सांगवी येथे राहणारे फिर्यादी हे इंटरनेट वर शेअर मार्केट संदर्भात माहीती घेत असताना त्यांनी Mstock या कंपनीचे शेअर ट्रेडींगचे जाहीरातीमधील लिंक क्लिक केली असात लिंकद्वारे महीला नामे कृती मो. नं. ८००८२५५९५७ यांनी फिर्यादी यांना L067. Mstock व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड केले व त्यांचे Mstock या कंपनीचे ट्रेडींग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतंवणुक केल्यास २५ ते ३० टक्के प्रॉफिट मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँकेच्या अकाऊंटला एकुण ६१,३०,०००/- रु भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांना गुतंवणुक केलेली रक्कम तसेच नफा परत न करता सदर रक्कमेचा अपहार करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथ गु.र.नं. १/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३१९(२), माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक ही मोठ्ठया स्वरुपाची असल्याने व अशा प्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिंबध होणेकामी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करणेकामी मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे यांनी आदेशित केले होते. त्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदीप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता व तपासकामी सपोनि. प्रविण स्वामी व पोउपनि. सागर पोमण, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि प्रकाश कातकाडे, मपोउपनि विदया पाटील यांची पथके तयार करुन गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरले ल्या बँक अकाऊंटपैकी एक बँक अकाऊंट हे वाघोली येथील डिलीव्हरी कंपनीमध्ये काम करणा-या इसमाचे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरठिकाणी पोउपनि वैभव पाटील व स्टाफने जावुन सदर इसमाकडे चौकशी करता त्याने सदरचे बँक अंकाउट हे आरोपी नामे अविनाश बाकलीकर व सतिश मोरे यांचे सांगणेकवरुन काढले असुन सदर अंकाउट हे संपुर्ण किटसह आरोपी अविनाश याचेकडे दिले असल्याचे सांगितले. क्ष्याबाबत अधिक तपास करता आरोपी अविनाश बाकलीकर यांचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता सदरचा आरोपी हा लोणावळा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सपोनि प्रविण स्वामी व पोउपनि सागर पोमण हे स्टाफ सह लोणावळा परिसरात आरोपीचा शोध घेणेकामी गेले असता सदर परिसरातील १००० पेक्षा अधिक व्हिलामध्ये नमुद आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हेबनावट आधारकार्डचा व वेगवेगळया नावाचा वापर करुन वेगवेगळया हॉटेल तसेच व्हिलामध्ये राहत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. गोल्डन व्हॅली लोणावळा येथील एका व्हिलामध्ये आरोपी नामे १) अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग वय २६ वर्षे व्यवसाय वैदयकीय शिक्षण रा. आनंदनगर मोठया पाण्याचे टाकीजवळ, बैंक कॉलनी नोड, निलंगा जि. लातुर मो. नं. ७८८७६१५३३१/ ८०८०३३१४३६, २) आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी वय २६ वर्षे व्यवसाय ऑनलाईन खरेदी विक्री रा. आरसी ५६६, नरेशविहार, खोडा कॉलनी, गाझीयाबाद मो. नं. ८५८७०७४६३२ ३) सतीश भगवान मोरे वय ३५ वर्षे व्यवसाय आयसीआयसीआय बँक स्वाईप मशिन विक्री रा. सी-१०१, स्वप्न पुर्ती संकुल सोसायटी, पोरवाल रोड, लोहगांव पुणे मुळगांव तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी मो. नं. ७०२०३४९७०६ हे मिळुन आले.

नमुद आरोपीचे ताब्यामधुन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन१२, लॅपटॉप ०१, बँक पासबुक किट- ०९, एटीएम/डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख १३५०००/- रुपये असे एकुण ३,०५,५००/- रु. चे मुद्देमालासह मिळुल आले. त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी अविनाश बाकलीकर हा छ. संभाजीनगर, पुणे शहर परिसरामध्ये वेगवेगळया इसमामार्फत बँक अंकाउट काढुन सदर अंकाउटची माहिती नेपाळ, चीन मधील सायबर गुन्हेगार यांना देवुन व त्यांचेशी संगणमत करुन त्यांनी एकप्रकारे सायबर फ्रॉड करणारी आंतरराष्ट्रीय कंपनीसारखे काम करत होते. कंपनीने दिलेले टोपननाव वापरुन सायबर विश्वामध्ये व इतर आरोपीना आपली ओळख लपवुन संपर्क करत होते व कंपनीने दिलेली जबाबदारी पार पाडत असे. आंतरराष्ट्रीय सायबर आरोपी हे सायबर गुन्हयांची मिटींग काठमांडु, नेपाळ येथे करत असल्याने तपासात दिसुन आले आहे. तसेच अविनाश याचे संपर्कातील चायना येथील डीके मकाबाका, कॅन्डी कंपनी युझर यांचेबाबत तपास चालु आहे. आरोपी बाकलीकर याने एका अंकाउटचे बदल्यामध्ये २-३ लाख रुपये घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी अविनाश ऊर्फ कॉम किंग हा सायबर गुन्हेगार यांचेकडुन पैसे स्वीकारण्यासाठी बायनान्स या प्लॅटफार्मच्या माध्यमातुन युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अविनाश यांचे मोबाईल फोनद्वारे एकुण ५५ अंकाउटची माहिती मिळुन आली असुन सदर बँक अंकाउटवर एकुण १५० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त आहेत. तसेच आरोपी अविनाश हा वेगवेगळ्या इसमांना काठमांडु नेपाळ याठिकाणी सायबर गुन्हेगार यांना अंकाउटचे किट घेवुन पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आदाब शेख ऊर्फ मॅडी हा देखील सायबर गुन्हेगारचे संपर्कात असुन अविनाश हा बँक अंकाउटचे ट्रान्झेंक्शन योग्यरित्या हाताळतो अगर कसे याबाबत वॉच ठेवण्यासाठी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथुन आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी सतिश मोरे हा आरोपी अविनाश यांचेकरिता काम करत असुन सायबर गुन्हयांसाठी लागणारी अंकाउट पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करणे, त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बैंक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांचेकडे मिळुन आलेले मुद्देमालाबाबत, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे. रविकिरण नाळे, पोलीस निरिक्षक सायबर सेल अधिक तपास करत आहेत.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि. सागर पोमण, पोउनि. वैभव पाटील, पोउनि. प्रकाश कातकाडे, पोउनि. विदया पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, दिपक माने, अतुल लोखंडे, प्रितम भालेराव, अभिजीत उकिरडे, श्रीकांत कबुले,सौरभ घाटे, संदिप टेकाळे, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, मुकुंद लोटके, प्रिया वसावे, दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

नागरीकांना आवाहन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणेसाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!