हडपसर मध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचा राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी घेतला धसका …..
हडपसर मधील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे विजयाच्या रेसमध्ये …..
कुणाल घोडके कार्यकारी संपादक 9860394949
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- हडपसर मतदार संघात मुख्य राजकीय पक्षा ऐवजी अपक्ष उमेदवार गंगाधरअण्णा बधे विजयाचा रेसमध्ये असल्याचे राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केले. बधेंच्या बाजूने मतदारांचा वाढता कौल पाहता विरोधकांची धाबे दणाणले. मतदारसंघात गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या लोकांना केलेल्या मदतीची पावती म्हणून कोंढवा हडपसर भागामधील नागरिकांनी बधे यांनाच मतदान करण्याचा निर्धार केला आहे. सामाजिक कामात अग्रेसर असलेले बधे यांना
एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी अशा दोन बलाढ्य पक्षांमध्ये कष्टकरी गरीब मतदारांच्या हितासाठी, व्यापाऱ्यांच्या हितासाठी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी प्रचाराची मोठी मुसंडी घेतली आहे. रामटेकडी वैदवाडी गोसावी वस्ती हडपसर गाव सत्संग नगर या भागात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, बुधवारी कोंढवा परिसरातील ३५४ झोपडपपट्टी, कृष्ण केवल नगर, परमार नगर कुबेरा पार्क सोसायटी, ममतानगर ,सुहानी सुजन लुल्ला नगर, माउंट कारमेल स्कूल मागे, कमीला महात्मा वसाहत, साळुंखे रोड , सिद्धार्थ नगर, एनआयबीएम कौसरबाग या भागातील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. नागरिक रुपेश कांबळे यांनी सांगितले, हडपसर मतदार संघामध्ये दोन राजकीय पक्षाची रॅली झाली मात्र, त्यांच्यापेक्षा दहा पटीने नागरिकांचा सहभाग गंगाधर बधे यांच्या रॅलीमध्ये दिसून आला. गंगाधर अण्णा बधे यांनी अनेक लोकांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. सख्खा भाऊ सुद्धा मदत करणार नाही मात्र गंगाधर अण्णा हे मदतीला धावून येतात. त्यामुळे गंगाधर बधे हेच निवडून येणारं यांमध्यें शंका नाही.
प्रा. दिनकर जगताप यांनी सांगितले, हडपसर मतदार संघामध्ये चार उमेदवार बलाढ्य आहेत. तीन राजकीय पक्षाचे व एक अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षाचा सुरू असलेला गोंधळ पाहता. मतदारांनी संपूर्ण मतदार संघात सामाजिक कार्यकर्ते अपक्ष उमेदवारी गंगाधर बधे रिंगणात आहेत. अशा अपक्ष उमेदवाराच्या मागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यावेळी सांगली पॅटर्न प्रमाणे अपक्ष उमेदवारास विजय होऊ शकतो

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

