आर्ट ऑफ लिव्हिंग” या संस्थेमार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी योगा, प्राणायम, ध्यानधारणा शिबीर


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१३.०५.२०२४ ते २२.०५.२०२४ पर्यत आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिराचे उद्घाटन आज दि.१३.०५.२०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर शिबिरास श्रीमती. नेहा ग्रोवर शहा, श्रीमती अनिता शिवदासानी व श्री प्रतिक शहा मार्गदर्शन करणार आहेत.

“आर्ट ऑफ लिव्हिंग” या संस्थेमार्फत कारागृहातील बंद्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य स्थिर राहण्यासाठी योगा, प्राणायम, ध्यान, एकग्रता यासारखे उपक्रम शिबीरात राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ कारागृहातील बंद्यांना होणार असून जिवनाबद्दल सकारत्माक भावना वृध्दींगत होवून दैनंदीन ताण-तणाव कमी होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती पी. पी. कदम, उपअधीक्षक श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. अंगद गव्हाणे, शिक्षक, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार यांनी कामकाज पाहीले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!