कोणताही पुरावा नसताना निर्जन स्थळी घडलेल्या बेवारस महिलेच्या खुनाच्या गुन्हयात, आरोपीस हडपसर तपास पथकाकडून अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:– दिनांक ०६/०४/२०२४ रोजी सांय १६.३० वाजणेचे सुमारासस नियंत्रण कक्ष पुणे येथून कॉल प्राप्त झाला की, मांजराई व्हिलेज, मांजरी रेल्वे स्टेशन जवळ, मांजरी (बु), पुणे येथे एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह मिळून आलेला आहे. त्याअनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजि नंबर- १३१/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले. सदर बेवारस मयत महिला हिचे मा. वैद्यकीय अधिकारी साो. ससून हॉस्पीटल पुणे यांनी दि. ०७/०४/२०२४ रोजी पोस्टमार्टम केले असता त्यात मयत महिलेच्या मरणाचे कारण हे गळा दाबून तिस मरण आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मयत महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन गळा दाबुन जीवे ठार मारलेले आहे म्हणून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं-६१८/२०२४ भा.दं.चि. कलम ३०२ अन्वये दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन करून दोन टिम तयार केल्या.
बेवारस मयत महिलेस नक्की मरण कधी आले हे माहीत नसल्याने व कोणताही उपयुक्त पुरावा नसल्याने दिनांक ०६/०४/२०२४ चे पूर्वी पासून चे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्याचे ठरवून त्याआधारे सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता, दिनांक ०१.०४.२०२४ रोजी एक संशयीत इसम मयत महिलेस सिरम इन्स्टीट्धुट येथून मांजरी रेल्वे स्टेशन पर्यंत शेअर रिक्षा मध्ये घेवून गेल्याचे दिसून आले. सदर रिक्षाची बारकाईने पाहणी केली असता, रिक्षाच्या हृदयर एका शाळेची जाहीरात लावलेली दिसून आली. त्याबाचत शाळेकडून माहीती घेतली असता, त्यांनी एकूण ३०० रिक्षांना जाहीरात लायलेली असल्साचे सांगीतले. सदर ३०० रिक्षांची माहीती घेवून त्यातुन आरोपीने प्रवास केलेली रिक्षा शोधून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संशयीत आरोपीने गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून १५ नंबर सिग्नल पर्यंत प्रवास केलेली रिक्षाचा शोध घेवून तपास करण्यात आला, तपासादरम्यान वेगवेगळ्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गोपनीय बातमीदारामार्फत कसोशीने च सातत्यपूर्वक शोध घेतला असता, संशयीत इसम हा ययत भागात कोठेतरी राहत असलेबाचत तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या बातमीवरून हडपसर तपास पथकाने सदर भाग पिंजुन काढून तेथून दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव, वय ३० वर्ष रा. मुळगाव महाळंग्रा, ता.चाकुर जिल्हा लातुर यास आज दिनांक ११.०५.२०२४ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री प्रविण पवार, मा. पोलीस सह आयुक्त सोो, पुणे शहर, श्री. मनोज पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व श्री आर राजा, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली, मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, सी. मंगल मोढवे, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरुध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

