गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाची धडक कारवाई.तीन दिवसात ०३ चारचाकी वाहनांसह एकूण १७,७१,८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. डॉ. विजय सूर्यवंशी सो, मा. संचालक (अं.व.द.) श्री. प्रसाद सुर्वे सो. यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री. सागर धोमकर सो, अधीक्षक श्री. चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक श्री. उत्तमराव शिंदे, श्री. सुजित पाटील, श्री. गणेश कसरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने दि. ०९/११/२०२४ ते दि. ११/११/२०२४ या तीन दिवसात गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर तसेच हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली.

या कारवाईमध्ये सदर पथकाने दौंड विधानसभा मतदारसंघात दोन चारचाकी वाहने हातभट्टी दारूसह जप्त करून दोघांना अटक केली. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघात वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने परराज्यातील (गोवा राज्य निर्मित व फक्त तेथेच विक्रीसाठी असलेल्या) विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करत असताना एका चारचाकी वाहनासह दोन इसमांस अटक केली. सदरील दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीन चारचाकी वाहनासह एकूण १७,७१,८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईत निरीक्षक श्री. विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप झुंजरुक, श्री. मयूर गाडे, श्री. मनोज होलम, श्री. सागर साबळे, स.दु.नि. श्री. सुवास पोळ, जवान संकेत वाजे, शुभम भोईटे, निखील देवढे, सुरेश खरात, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभाग घेतला.
राज्य उत्पादन


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!