कोंढवा पोलीसाची कौशल्यपुर्ण धडाकेबाज कारवाई ! घरफोडी व स्पोर्ट बाईक चोरी करणारा सराईत आरोपीकडुन ६ घरफोड्या व ४ मोटार सायकल जप्त…


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे प्रतीभा हौसिंग सोसायटी येथे एका इमारतीमध्ये ४ फलॅट ३ अनोळखी आरोपी यांनी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांनी सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक आरोपी यांचा सीसीटिव्हि फुटेजच्या माध्यमातुन शोध घेत असताना सदर गुन्हा हा आरोपी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख, वय १८ वर्षे, २ महिने, रा. सैय्यदनगर, ग.न.२३, हडपसर, पुणे व महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, वय १९ वर्षे, रा. गाडी तळ हडपसर पुणे व विधी. बालक यांनी केल्याचे पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, मयुर मोरे यांनी उघड केले होते. सदर आरोपी पैकी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख यास दि.१४/११/२०२४रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडुन त्यावेळी १० हजार रुपये किं एक होंन्डा कंपनीची डिओ मोटार सायकल जप्त करुन हडपसर पोलीस ठाणे कडील गुरन. १७१६/२०२४, भादवि. कलम. ३०३(२) प्रमाणे गुन्हा उघड करण्यात आला होता.

नमुद गुन्हयात महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, हा फरार झाला होता. फरार कालावधीमध्ये त्याने विश्रातवाडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक होवुन येरवडा कारागृह येथे जमा करण्यात आले होते. नमुद आरोपी याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याबाबतची गुप्त माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अक्षय शेडगे यांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी याच्याकडे तपास करणे असल्याने मा. न्यायालयाकडुन परवानगी घेवुन ताबा घेण्यात आला होता. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्याने १) प्रतिभा हौसिंग सोसायटी, फेज- १.आय.सी.आय.सी.आय. बैंक शेजारी २) अर्जुन मुक्ताई बिल्डींग, कोंढवा हॉस्पीटलजवळ येवलेवाडी पुणे ३) फलॅट नं.१०७, वसंतलता अर्पा. ग.०१, गोकुळनगर शिव पार्वती मंगल कार्यालय शेजारी कोंढवा बुगा पुणे ४) नताशा हिल व्हिव सोसायटी, फलॅट नं.१०३, पहिला मजला, कोंढवा खुा पुणे ५) परफेक्ट मेडिकल शॉप, गाळा नं. डी२/४, सनश्री डी बिल्डींग, एनआयबीएम रोड कोंढवा खुाा पुणे ६) फलॅट नं.१०१, स्वप्नपुर्ती निवास, श्रीनाथ पार्क दिल्ली पब्लिक स्कुल, महम्मदवाडी, कोंढवा पुणे येथे घरफोडीचे ६ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडुन सदर घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे रोख रक्कम असा एकुण १,३१,६४०/-रु कि मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर आरोपी यांच्याकडुन चोरीच्या दोन अॅक्सिस व दोन यमाहा आर-१५ अश्या चार मोटार सायकल एकुण किंमत ३,०९,७९६/- रु कि जप्त केल्या आहेत. आरोपी याच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.

१) पिपंरी पोलीस ठाणे येथे गुरन. ८५३/२०२४ भा. न्या. संहिता. ३०३ (२).
२) हडपसर पोलीस ठाणेस गुरन. १६५५/२०२४ भान्यासंहिता. ३०३ (२),
३) भारती विदयापीठ पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. १०१७/२०२४ भान्या संहिता. ३०३(२),
४) कोंढवा पोलीस ठाणेस गुरन. ९०५/२०२४ भा. न्या. सहिता. ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४).
५) कोंढवा पोलीस ठाणेस गुरन. १०५/२०२४ भा.द.वि.३८०,४५४,४५७.
६) कोंढवा पोलीस ठाणेस गुरन. ९५४/२०२४ भा.न्या. सहिता.३०५, ३३१(४).
७) कोंढवा पोलीस ठाणेस गुरन. २४२/२०२४ भादवि. कलम. ३८०.
८) कोढवा पोलीस ठाणेस गुरन. ५७५/२०२४ भादवि. कलम. ३७९.
९) कोढवा पोलीस ठाणेस गुरन. ९५५/२०२४, भा. न्या. सहिता. कलम. ३३१ (४),३०५
१०) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. १२४८/२०२४, भा. न्या. संहिता. कलम.३३१ (३),३३१ (४),३०५ (ए).

सदर कामगिरी ही मा. अमितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. रंजन शर्मा साो, सह पोलीस आयुक्त, मा.मनोज पाटील, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. धंन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो उप निरी बालाजी डिगोळे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!