स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधुन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणा-या चोरटयास केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील स्वारगेट एस टी स्टँड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथेचोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन सदर भागात सकाळी गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधकगस्त करणे बाबत आदेशित केले होते.

Advertisement

त्यावरुन दि.२२/०१/२०२५ रोजी सदर पथक गस्तीवर असताना एक इसम स्वारगेट पी एम पी एम एल बस स्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयीतरित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आला त्याचे हालचालीवरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यास हटकले असता तो पळुन जावु लागल्याने त्यास स्टाफचे मदतीने जागीच ताब्यात घेवुन त्यास त्यांनी त्यांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सतिश ज्ञानेश्वर शिरोळे वय ३२ वर्षे रा. फिरस्ता (पुणे स्टेशन व स्वारगेट बस स्टैंड परीसर) मुळ गाव मु पो दहीटणे ता. दौंड जि पुणे असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे ओळखपत्र मागितले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यावेळी त्याचे ताब्यात तीन मोबाईल मिळुन आले. सदर मोबाईल फोन बाबत त्यास विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक चौकशी कामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मागिल महीन्यात सकाळचे वेळी स्वारगेट पी एम टी बस स्टॉप येथे बस मध्ये चढत असलेल्या एका महीलेचा मोबाईल गर्दीचा फायदा घेवुन चोरला आहे. तसेच दोन मोबाईल पुणे स्टेशन परीसरात चोरी केले आहेत. असे सांगितले

त्यानंतर मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस ठाण्याकडील गुन्हे अभिलेख पडताळुन अधिक माहीती घेतली असता सदर मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. २७/२०२५, भा. न्या. सं ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर गुन्हयांमध्ये आरोपीस अटक करुन त्याचे कडे अधिक तपास केला असता त्याने पुणे स्टेशन व स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरातुन चोरी केलेले मोबाईल फोन हे त्याचे ओळखीचा मोबाईल दुकानदार नामे मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी वय ३४ वर्षे धंदा हसना एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी रा. लेन नं ०५, अल्ला हु अकबर बिल्डींग फ्लॅट नं ३०२,अशरफनगर, कोंढवा, पुणे यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्याचे निवेदनावरुन सदर मोबाईल दुकानदार यांचेकडुन एकुण ७,४५,०००/- रु. किं. चे वेगवेगळया कंपन्यांचे एकुण ४३ मोबाईल फोन व सॉफ्टवेअर मारणे कामी वापरलेला एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अटक आरोपी सतिश शिरोळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरी. रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, सुजय पवार, दिपक खंदाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, संदीप घुले, यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!