बंदी असलेल्या वेब सिगारेट विक्री करणाया इसमावर केली कारवाई


आकाश पांचाळ सहसंपादक
गुन्हे शाखा, युनिट-४, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे  युनिट ०४ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना सेनापती बापट रोडवरील द रॉक शॉप, कुसाळकर चौक, सेनापती बापट रोड़, पुणे या दुकानात बंदी असलेल्या ई सिगारेट, हुक्का फ्लेवर, व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे माहिती मिळाल्याने युनीट ०४ चे पोलीस पथकाने सदर दुकानावर छापा कारवाई करुन त्यामध्ये एकुण २,४०,९०० /- रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे ई सिगारेट, हुक्का फ्लेवर, व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट जप्त केले. सदर बाबत इसम नामे चेतन धर्मराज सावंत, वय २५ वर्षे, रा. शांतीनगर हौसिंग सोसायटी, घर नं. ९, चिखली, निगडी, पुणे. याचेवर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे खटला नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ०२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट ४ यांचे सुचनेप्रमाणे युनिट ४ कडील पोलीस पथकाने केली.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!