स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनची दमदार कारवाई ! घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना केले अटक
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आळेफाटा पो.स्टे. ग.र.नं. २७७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३००५ (अ) ३३९ (३) प्रमाणे दि.०९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे विक्रम महादू डेरे वय २० वर्षे, रा. मंगरूळ, ता. जुन्नर जि पुणे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावून पारगाव येथे गेले असताना दि. ०९/१०/२०२५ रोजी दुपारी १२/०० ते ०३/०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजावाटे आत प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण साडे तीन तोळे वजनाचे एकूण १,७५,०००/- किचे चोरी करून नेले आहेत. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
दिवाळी सणाचे सुख्यातीस जुन्नर, खेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदरचे मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळांची पाहणी करून सदर घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती, गुन्हे पद्धत एक सारखीच होती. वरील गुन्हयामध्ये सुमारे १०० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. गुन्हयामध्ये एका काळे रंगाचे मोटार सायकलवरील दोन संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झ गाले. तसेच प्रत्येक घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल हो अहिल्यानगर बाजूकडे गेली होती.
संशयित मोटार सायकलचा व आरोपीचा स्था.गु.शा. व आळेफाटा पो स्टे कडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित मोटार सायकल ही यूनिकॉर्न मोटार सायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले, किशोर हापूस भोसले दोघे रा. कासाटी, आष्टी, जि बीड हे वापरत असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले.
तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, आळेफाटा परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी १) मोहन भिकाजी भोसले वय २० वर्षे, २) किशोर हापूस भोसले वय २० वर्षे, दोघे रा. कासाटी, आष्टी, जि बीड यास युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता,
आरोपींकडून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सवाकल असा एकूण सुमारे ८,५०,०००/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो.नि. विश्वास जाधव, मंचर पो स्टे चे पोनि श्रीकांत कंकाळ, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सपांगे, स्था.गु.शा.चे सपोनि महोदय शेलार, पोसई अमित सिदपाटील, अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, हेमंत विरोळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, आळेफाटा पो स्टे चे श्रेणी पोसई सतिश टाव्हरे, अमित म्हाळुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

