पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई …”


सागर कसबे पुणे प्रतिनिधी
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष पिंपरी चिंचवड
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत रहिवाशी हॉटेल व मसाज पार्लर स्पा च्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध वेश्याव्यवसाया विरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करणे बाबत पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते यांनी त्यांचे अधिपत्याखालील सपोनि श्री. भास्कर पुल्ली व पथक यांचे सह पुढील प्रमाणे धडक कारवाया केलेल्या आहेत.
काल दिनांक २१/११/२०२५ रोजी १९/१५ वा चे सुमारास चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील आळंदी फाट्याजवळील सप्तगिरी लॉज येथे छापा टाकुन वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या ५ पिडीत महिलांची सुटका केली असून सदर प्रकरणी लॉज चालक मालक गजानन सटवाजी आव्हाड वय-२८ वर्षे रा. आळंदी, ता. खेड जि.पुणे मुळ रा. दहितना ता. जि. परभणी याचे विरुध्द चाकण पोलीस येथे गुरनं १०३३/२०२५ भा.न्या. सं कलम १४३ (३), सह पिटा कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.
मागील आठवडयात अशाच प्रकारे हिंजवडी परिसरातील “सनराईज वेलनेस आयुर्वेदीक स्पा ” येथे छापा टाकुन वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणारी १ महिला तसेच रावेत परिसरातील ” निसर्गम आयुर्वेदिक स्पा” येथे छापा टाकुन वेश्यागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या २ महिलांची सुटका करुन सबंधीत स्पा चालक मालक महिला आरोपी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सन २०२५ मध्ये अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकुण २६ आस्थापनांवर छापे टाकुन भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात एकूण ६ मसाज पार्लर/स्पा, ७ हॉटेल, ३ रहिवाशी फ्लॅट अशी ठिकाणे व १० ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणारा वेश्याव्यवसाय यांचा समावेश आहे. सदर २६ गुन्हयांमध्ये एकुण ४२ आरोपींना अटक करण्यात आली असुन ५५ पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर उभे राहुन अश्लिल हातवारे करणाऱ्या महिलांविरुध्द पिटा अॅक्ट कलम ८ अन्वये एकुण ९७ महिलांवर ६५ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. सदरची धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तिव्र करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त यांनी ४ आस्थापना बंद करण्याचे जारी केले आदेश…
मागील १ महिन्याचे कालावधीत सार्वजनिक ठिकाणांचे परिसरात मसाज पार्लर/स्पा व रहिवाशी ठिकाणांचे आडुन अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकुण ४ आस्थापना १ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी प्राथमिक चौकशी अंती आदेश पारित केले आहेत. त्यात वाकड परिसरातील “रुपेन स्पा” व रहिवाशी फ्लॅट, हिंजवडी परिसरातील “द वेदा स्पा” सांगवी परिसरातील “न्य ओम स्पा” यांचा समावेश आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या इतर आस्थापनांची देखील प्राथमिक चौकशी चालु असुन त्यात लवकरच योग्य ते आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा.पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार (गुन्हे), मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन गिते, सहा पालीस निरीक्षक श्री. भास्कर पुल्ली, अंमलदार सपोफौ सुनिल शिरसाट, पोहवा/४९१ भगवंता मुठे, पोहवा/१५३६ मारुती करचुंडे, पोहवा /१७६८ गणेश कारोटे, मपोहवा /१००६ श्रध्दा भरगुडे, मपोहवा १३७७ वैष्णवी गावडे, मपोहवा /११२९ निलम बुचडे, मपोहवा /१३७८ संगिता जाधव, पोशि/१७९० उदयकुमार भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!