गंगाई सपाटे शिक्षण संकुलात संविधान दिन साजरा.


बालाजी शिंदे पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन तारापूर :- येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर भारतीय राज्यघटना या पुस्तिकेचे सुद्धा पूजन करण्यात आले. 26 नोव्हेंबर या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सकाळी सर्व विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरी करून संविधान बाबत जनजागृती करण्यात आली त्यानंतर प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगणारे विविध प्रसंग सांगून त्यांचे विचार व्यक्त केले.त्याचबरोबर प्रशालेतील सहशिक्षक सिद्धेश्वर कसबे व सौ.संध्या कदम यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाबद्दल अधिकची माहिती सांगितली. प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया व संविधानातील नमूद विविध कलम त्यांचे अर्थ,संविधानातील नमूद हक्क,कर्तव्य याबाबत विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व संविधानाचा सन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने त्यातील नमूद हक्क व कर्तव्य यामध्ये समतोल ठेवून आपले जीवन समृद्ध करावे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले.
याच कार्यक्रमात मुंबई या ठिकाणी 26/11 ताज हॉटेल वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस व नागरिक यांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली. यावेळी भारतीय नागरिक या नात्याने आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सुरक्षाविषयक जबाबदारीचे भान राखून पोलीस प्रशासन भारतीय सैन्य दल त्याचबरोबर इतर सुरक्षा विषयक यंत्रणा यांच्या विषयी आपल्या मनामध्ये आदर निर्माण होईल अशी वर्तनुक प्रत्येक भारतीय नागरिकांनी ठेवली पाहिजे असे विचार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!