⭐ मुंबई पोलिसांचा खरंच सलाम करण्यासारखा उपक्रम! ⭐


बालाजी शिंदे पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज !ऑनलाईन मुंबई:-  आज आझाद मैदान पोलीस ठाणे – प्रेरणा हॉल येथे परिमंडळ एक अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांकडून गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मोबाईल, बाईक आणि अन्य मालमत्तेचा भव्य वितरण कार्यक्रम पार पडला.
सामान चोरीला गेला की परत मिळत नाही अशी जनता समजूत बाळगते…
पण आज जवळपास ४५ ते ५० लाख रुपये किमतीची मालमत्ता नागरिकांच्या हाती परत देण्यात आली. ✨
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी
👏 माननीय पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे साहेब
👏 सहायक पोलीस आयुक्त श्री. तन्वीर शेख साहेब
👏 सर जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे श्री. रईस शेख साहेब
👏 तसेच गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री. प्रशांत नेरकर साहेब
आणि परिमंडळ एकातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.
आपण पोलीस फक्त वाईट म्हणून बोलतो…
पण अशा चांगल्या गोष्टी लोकांसमोर यायलाच हव्यात! 🙌
आज जो विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे,
तोच मुंबई पोलिसांची खरी ओळख आहे! 🚔🇮🇳
मुंबई पोलीस—कीप इन्स्पायरींग! 💙

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!