सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणारा सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या माज्यामुळे कित्येक वेळा पक्षांचे जिव धोक्यात आले आहेत. नायलॉन मांजावर मा न्यायालयाने बंदी घातलेली आहे परंतु तरीही काहीजण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशिर रित्या चोरून विक्री करतात त्याअनुशंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार सो. यांनी केलेले आहेत.
दिनांक २७/१२/२०२३ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पुणे सातारा रोडवरील पंचवटी इमारती पाठीमागील कॅफे पिटर हॉटेल जवळ फुटपाथवर धनकवडी पुणे येथे एक इसम शासनाने बंदी घातलेल्या घातक अशा पतंगाचे नायलॉन मांजाची बंडले विक्री करण्याकरिता आला आहे अशी माहिती प्राप्त होताच सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांचे सुचनांप्रमाणे तपासपथका कडील पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे व अंमलदार यांनी कॅफे पिटर हॉटेल धनकवडी जवळील परिसरात जावून मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे वेदांत राकेश गाढवे, वय १९ वर्षे, धंदा शिक्षण, रा. रुम नं.१६, गल्ली नं.२, शंकर महाराज वसाहत, धनकवडी पुणे यास ०४/२० वा ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील पोत्याची झडती घेता त्यां घरामध्ये किं रू ४,४००/- चा नायलॉन मांजा विक्री करीता बाळगलेला मिळून आल्याने सदरचा मांजा जप्त करून वेदांत राकेश गाढवे, याचे विरूध्द सहकारनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३५३/२०२३ भा. दं. वि. कलम १८८.३३६ पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे कलम ५,१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सो। पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सो।, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोा, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, सागर सुतकर, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

