पुण्यात भारी ! समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी .. जादुटोणा सारखे अघोरी कृत्य करून कोटींची फसवणूक करणा-या मुख्य आरोपींना अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर १९२/२०२३ भा.दं. वि. कलम ३२८,४२०,४०६,१२०(ब),३४ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनयम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी व साक्षिदार शेख अब्दुल बासीत अब्दुल लतीफ या व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख ५५ हजार फसवणूक झाली होती. त्याबाबत दि. २९/०८/२०२३ रोजी समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण ०६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात पोलीसांनी एम.पी.आय. डी अन्वये कलमवाढ केलेली आहे. दरम्यानच्या काळात सदर आरोपींवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ९८७/२०२३ भा.दं. वि. कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१,३४ प्रमाणे व गुन्हा रजिस्टर नं. १२६६/२०२३ भा.दं. वि. कलम ४२०,४०६,३४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३. ४ प्रमाणे एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणुक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तसेच लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील गुन्हा रजिस्टर नं. २५२/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४६७,४७०,४७१,३४ प्रमाणे फिर्यादी मुक्तार हुसेन मोहमंद यांची एकुण रक्कम १ कोटी ०६ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, गेल्या ०४ महीन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला चार गुन्हे मिळून एकूण रक्कम ०६ कोटी २३ लाख ०५ हजार इतक्या रूपयांची फसवणूक केल्याने गुन्हे दाखल झालेले आहेत.

Advertisement

सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी वेगवेगळ्या तपास यंत्रणेला दिलेले होते. समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सूरज बंडगर व श्री. प्रमोद वाघमारे पोलीस निरिक्षक (गुन्हे) यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. आरोपींनी ०४ महिने त्यांचे घर लॉक करून फरार झाले होते. आरोपींना शोधण्याचे पोलीसांना मोठे आव्हान होते. परंतू पोलीस उप-निरी. सौरभ थोरवे व पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण केले व बातमीदारामार्फत गोपनीय माहीती काढली की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व महीला आरोपी सीमा उर्फ रोहा अब्दुल हुसेन नईमआबादी हे कॅम्प परिसरात सोसायटीत लपून बसलेले आहेत. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून व वरिष्ठांच्या आदेशाने स्टाफच्या मदतीने दोन्ही आरोपींना सापळा रचून सदर सोसायटीमधून ताब्यात घेतले. सदर आरोपींना समर्थ पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आले. सदर आरोपींना मा. कोर्टात हजर केले असता आरोपींना ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. श्री संदीप गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १. पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, श्री. सूरज बंडगर, बरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, ज्योती कुटे, पोअं. हेमंत पेरणे, सपोफौ, दत्तात्रय भोसले, पोहवा, संतोष ढमाळे, मपोहवा, निलम करपे, पोहवा, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोअं शरद घोरपडे, प्रफुल्ल साबळे, मपोअं. सीमा गायकवाड, स्वाती भालेराव यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!