वानवडी पोलीस स्टेशन व फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान यांच्यामार्फत सुरक्षित, असुरक्षित स्पर्श विषयी जनजागृती कार्यक्रम….
पंकेश जाधव संपादक 7020794626
Advertisement
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- वाढते बाल लैंगिक अत्याचार घटना घडत असल्याने दामिनी पथक व मुस्कान संस्थेमार्फत शाळांमध्ये जनजागृती सत्र करत आहे. मुस्कान संस्थेतील समुपदेशक प्रमोद पाटील व पूजा कडू यांनी डॉ. दादा गुजर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महमदवाडी व पुणे म.न.पा. शाळा क्र. 190 सदाशिव नगर या शाळेतील मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श अश्या वेळी बालकांना कोण कुठे अत्याचार करू शकतात व त्याला विरोध करण्यासाठी नाही म्हणणे, पळून जाणे व विश्र्वासातील व्यक्तीला सांगण्यास सांगितले. यावेळी वानवडी दामिनी पथकातील पूनम राणे व सुनिता कोळी यांनी बालकांना 112 नंबर बाबत माहिती दिली व बलकांशी संवाद साधला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

