गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी विधी संघर्षित बालकाकडून एक अग्निशस्त्र व एक राऊंड जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
Advertisement
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- युनिट 3 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या बातमीवरून विधी संघर्षित बालक राहणार गल्ली नंबर ४, शिवशंभो नगर कात्रज पुणे यास भैरवनाथ मंदिराजवळ धायरी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याचे कडून 40,000/- रुपये किमतीचे अग्निशस्त्र व 500/- रुपये किमतीचा एक राउंड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमूद विधी संघर्षित बालका विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128/2024 आर्म ॲक्ट कलम 3, (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी ही युनिट 3 व पथकाने केली आहे…

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

