रिक्षामध्ये सुमारे ४ दिवसापूर्वी विसरलेले सोन्याचे दागिने चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अंमलदार यांनी सीसीटिव्ही व तांत्रिक विश्लेषणव्दारे रिक्षा चालकाचा शोध घेऊन परत मिळवुन दिले
पंकेश जाधव संपादक 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- महिला नामे अनुसया पाटील, रा. सणसवाडी ह्या दि.२८/१२/२३ रोजी सणसवाडी, पुणे येथुन चंदननगर येथे येण्याकरीता रिक्षाने निघाले. त्या मुंढवा खराडी बायपास रोडवर रिलायन्स मार्ट येथे उतरल्या. तेथुन थोडे पुढे चालत गेलेनंतर त्यांची कपडे व सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्येच राहीली आहे. त्यावेळेस त्या परत रिलायन्स मार्ट चौक येथे आले असता, तो पर्यंत रिक्षाचालक हा निघुन गेला होता, त्यांनी रिक्षाचा आजुबाजुस शोध घेतला परंतु सदरची रिक्षा मिळुन आली नाही. त्यामुळे त्यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस स्टेशन येथे येऊन कळविले असता, पोशि आव्हाड, पोशि कोद्रे व पोहवा सय्यद यांनी रिलायन्स मार्ट चौक व आजुबाजुचे सीसीटिव्हि पाहुन सदर रिक्षाचा नंबर प्राप्त करुन, सदर नंबरचे आधारे मिळालेल्या माहिती नुसार तांत्रिक विश्लेषण करुन रिक्षा चालक याचा शोध घेऊन, त्याचेकडील वरील महिला यांची कपड्याची बॅग व सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत मिळवुन दिले. महिला नामे अनुसया पाटील, रा. सणसवाडी यांना त्यांची बॅग व सोने परत देण्यात आलेले आहे. याबाबत अनुसया पाटील, रा. सणसवाडी यांनी पोलीसांचे आभार मानलेले आहे.
सदरची कारवाई हि श्री. रंजन कुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, श्री. संजय पाटील साौ, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे, श्रीमती मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक, (गुन्ह), चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे दिमतीत श्री. प्रशांत माने, सहा. पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ, महेश नानेकर, विकास कदम यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

