खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महीन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलीसांनी ठोकल्या बेडया


पंकेश जाधव संपादक 7020794626

मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७/२०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे हा गुन्हा दाखल झालेपासुन गेले दोन महिन्यापासुन स्वतःचे अस्तीत्व लपवुन फिरत होता. काल दिनांक १८/०१/२०२४ रोजी मुंढवा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वपोनी श्री महेश बोळकोटगी यांचे आदेशाने मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार/४१५७ महेश पाठक यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, आरोपी अनुप ढगे हा उरुळी कांचन पुणे या ठिकाणी येणार आहे. सदरची माहीती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली. त्यांनी लगेचच तपास पथकातील अधिकारी सपोनि संदिप जोरे यांना स्टाफसह बातमी ठिकाणी जावून आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सपोनी जोरे व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे अत्यंत शिताफिने वरील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे यास उरुळीकांचन येथील पीएमटी बस स्टॅन्ड येथे सापळा रचुन ताब्यात घेवुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

 

सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री रामनाथ पोकळे साो अति कार्यभार सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा.श्री ए. राजा साो पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्रीमती संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे, पोहवा/४१०२ दिनेश भांदुर्गे पोहवा/५४१८ संतोष जगताप, पोहवा/४१५७ महेश पाठक, पोहवा झुरंगे, पोशी ४४४१ स्वप्नील रासकर पोशी ८२०८ हेमंत पेरणे, पोशी ८१४३ सचिन पाटील यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!