” हडपसर पोलीस ठाणेकडील सायबर पथकाकडून, गहाळ झालेले किं.रू ७,५०,५३७/- चे ३१ मोबाईल हस्तगत. “
आकाश पांचाळ सह-संपादक 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात ( Central Equipment Identiy Register CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा वापर हडपसर पोलीस ठाणेकडील सायबर विभागाचे प्रमुख सुशिल डमरे (पोलीस उप निरीक्षक), महिला पोलीस अंमलदार गायत्री पवार, माधुरी डोके, आणि सोनाली कुंभार यांचे टिमने केला. CEIR प्रणालीवर वेगवेगळ्या राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये हरवलेले मोबाईल चालु असल्याबाबत माहीती दिसत होती. सायबर टिमने हरवलेल्या मोबाईलची माहीती संकलीत करून त्यानंतर मोबाईल फोन वापरकरर्याशी संपर्क साधुन करून दिल्ली, कर्नाटक, बिहार, या राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यामध्ये नागरिकांचे किं.रू ७,५०,५३७/- चे ३१ मोबाईल हस्तगत केले आहेत. सदरचे हस्तगत करण्यात आलेले मोबाईल त्यांचे मूळ मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त साो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. आर. राजा साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे साो, पोनि. (गुन्हे), श्री. संदिप शिवले सो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे सायबर पथकाचे पोलीस उप निरीक्षक, सुशिल डमरे, महिला पोलीस अंमलदार, गायत्री पवार माधुरी डोके, आणि सोनाली कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

