पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन,,,
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पोलीस आयुक्तातील फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक विश्वासराव धुमाळ यांचे उपचारादरम्यान सोमवार दिनांक 29/ 1/ 2024 रोजी निधन झाले आहे, अशोक धुमाळ हे आंबेगाव येथील राहत्या घरातून तिसऱ्या मजल्या वरून पाय घसरून पडले होते, गंभीर जखमी झालेल्या अशोक धुमाळ यांना खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे, अशोक धुमाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुबी हॉल हॉस्पिटल येथे धाव घेतली आहे,,

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

