प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य) आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुजित प्रकाश मोरे यांचे सासरेयांना प्रा. फ. मु. शिंदे यांचे हस्ते नांदेड येथे संत नामदेव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- येथील प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे (शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य) आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुजित प्रकाश मोरे यांचे सासरे यांना प्रा. फ. मु. शिंदे यांचे हस्ते नांदेड येथे संत नामदेव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नानक साई फाउंडेशन नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री ग्रंथ साहिब भवन, एसी हॉल, नांदेड येथे आयोजित केलेल्या संत नामदेव साहित्य संमेलनामध्ये ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी, प्रदान करण्यात आला. या संमेलनात साहित्यक, पत्रकार,व इतर मान्यवरांना देखिल पुरस्कार प्रदान करण्यात आले.. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदिश कदम, संस्थेंचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन देवकर, महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
नुकतेच डॉ, प्रा. वामन निंबाजी साळवे यांना शिक्षक विकास परिषद गोवा चे 27 वे राष्ट्रीय अधिवेशनात 10 डिसेंबर 2023 रोजी भारताचा रत्न Jewel of India पुरस्काराने पणजी गोवा येथे देखील मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

