डॉ. साळवे यांना संत नामदेव साहित्य पुरस्कार
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे : लेखक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना नुकताच नानक-साई फाउंडेशन नांदेड या संस्थेच्या वतीने संत नामदेव साहित्य संमेलनात संत नामदेव साहित्य पुरस्कार प्रा. फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Advertisement
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई व नानक-साई फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संमेलन झाले. साहित्यिक, पत्रकार व इतर मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम, संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन देवकर, महाराष्ट्र राज्य संस्कृती व साहित्य मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

