एम. जी रोड येथील पिटर कॅफेमध्ये चोरी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयला संभाजीनगर येथुन अटक.


पंकेश जाधव संपादक 7020794626

लष्कर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– फिर्यादी नामे अमोल रामचंद्र पवार, रा. कोथरूड, पुणे यांचे अंबा कॉम्प्लेक्स, एम. जी रोड, कॅम्प, पुणे येथे कॅफे पिटर नावाचे कॉफी शॉप असुन, त्यांच्याकडे गेली दोन वर्षापासुन काम करणारा डिलीव्हर बॉय नामे अंगद राजेंद्र कदम, वय २४ वर्ष, रा. पोलादपुर, जि. रायगड याने दि. २६/१२/२०२४ रोजी रात्री ०१/४० वा. सर्व कामगार हे झोपी गेलेले असताना, कॉफी शॉप मध्ये आला कॉफी शॉप उघडुन आत प्रवेश करून लॉकर च्या काऊंटर मध्ये ठेवलेले रोख ९५,०००/- रूपये चोरून निघुन गेला. याप्रमाणे फिर्यादी नामे अमोल रामचंद्र पवार यांनी लष्कर पोलीस स्टेशन, येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्ह्यातील चोरटा अंगद कदम हा रोख ९५०००/- रूपये चोरून महाबळेश्वर, महाड, नाशिक व संभाजीनगर इत्यादी ठिकाणी फिरून चोरलेल्या रकमेवर मजा मारत असताना, तपास पथक लष्कर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांनी केलेल्या तांत्रिक माहितीवरून आरोपी अंगद राजेंद्र कदम हा हर्सुल, जि. संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाल्याने, मिळालेल्या माहितीच्या आधारे व मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त, परि. ०२, पुणे शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे), लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे व पोलीस अंमलदार पो. हवा. महेश कदम, पो. हवा. सोमनाथ बनसोडे, पो. हवा. संदिप उकिरडे, पो. हवा. सचिन मांजरे, पो. हवा. प्रविण गायकवाड, पो. शि. लोकेश कदम, पो. शि. सागर हराळ, म. पो. शि. अलका ब्राम्हणे यांनी अथक प्रयत्न करून आरोपीचा संभाजीनगर येथे शोध घेवुन आरोपीस संभाजीनगर येथुन अटक केली आहे, त्याच्याकडुन चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!