येरवडा मध्यवती कारागृह व येरवडा महिला कारागृहातील बंद्यांसाठी बेड साईड केअर गिव्हर्स” हा २० दिवसांचा प्रशिक्षण व मार्गदशन उपक्रम राबविण्यात येत आहे


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवती कारागृह व येरवडा महिला कारागृह पुणे 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कर्नल क्युब फाऊंडेशन, पुणे या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवती कारागृह व येरवडा महिला कारागृहातील बंद्यांसाठी वयोवृद् माणसाचे आजारपणात कशी काळजी घ्यावी, यावावत “बेड साईड केअर गिव्हर्स” हा २० दिवसांचा प्रशिक्षण व मार्गदशन उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम व प्रशिक्षण शिबिरात एकुण १२० पुरुष व महिला बंद्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यातील पहिल्या टप्यात २० पुरुष व १३ महिला बंद्यांनी यशस्वी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. त्यानुसार सदर बंद्यांना आज दि.०८.०१.२०२५ रोजी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा फायदा कारागृहातील वयोवृध्द बंद्यांच्या आजारपणात काळजी घेण्यासाठी निश्चितपणे होईल.

सदर उपक्रम मा. प्रशांत बुरडे (भा.पो. से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक. कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल ढमाळ, अधीक्षक, श्रीमती. पल्लवी कदम, अति. अधीक्षक, श्री. आर ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. ए एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी. श्री. अंगद गव्हाणे, शिक्षक, श्रीमती त्रऋनाक्षी गवळी, शिक्षक संबंधीत संस्थेचे प्रतिनिधी श्री. कर्नल फुले, श्री. अनिरुध्द् देशमुख, श्री. शेखर नवाथे, श्री. सुनिल मोरे, श्री. नरेंद्र डांगी, श्रीमती. सावन पोंक्षे, श्रीमती. कमलिनी कानेटकर, श्रीमती. विनिता फुले, श्रीमती. स्मिता गोखले, श्रीमती. स्निग्धा देशमुख वश्रीमती. साधना डांगी यांनी कामकाज पाहीले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!