मोक्कामध्ये एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा, युनिट-4 चे ताब्यात
संतोष मलाव पुणे शहर प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट-4 चे पथक चतुशृंगी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार जहांगीर पठाण व विशाल इथापे यांना गोपनीय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, चतुर्शिंगी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 751/2023 भा.द. वि. कलम 307,323,141,143,144,147, 148,149 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी 1999 चे कायदा कलम 3(1) (ii) 3 (2) 3 (4)
या दाखल गुन्ह्यात एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी *नामे मोन्या उर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे वय 23 वर्ष रा. राजीव गांधी नगर घर नं.192 खडकी पुणे.* हा गाडी अड्डा खडकी दत्त मंदिरजवळ येथे थांबला असल्याची अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिटच्या 4 पथकाने बातमीप्रमाणे खात्री करून त्यास ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून मा . सहाय्यक पोलीस आयुक्त सो, खडकी विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

