बिबवेवाडी पोलीसांनी सराईत वाहनचोरट्यास व देहूरोड पोलीस ठाणेकडील पाहिजे आरोपीस अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून तिन दुचाकी वाहने जप्त केली.


जोसेफ नदेसन पुणे शहर प्रतिनिधी

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्युज ! ऑनलाइन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३/१२/२०२४ रोजी २२.३० वा.चे दरम्यान नवरंग मित्र मंडळ गणपती मंदिराजवळ, सिल्व्हर इस्टेट जवळ, बिबवेवाडी, पुणे येथे येथे त्यांची यामाहा एफड़झेड एम एच १२ एच एम. ००८१ एम एच १२ एच एम. ००८१ अशी असलेली ही लॉक व पार्क करुन ठेवली केली असता ती अज्ञात इसमाने चोरुन नेली आहे फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३२४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार ज्योतिष काळे व प्रणय पाटील यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी यश ज्ञानेश्वर खलसे  १९ वर्षे रा.आगम मंदिराजवळ, पाण्याचे टाकीशेजारी कात्रज पुणे. मुळ-राजवाडा जवळ वरवंड, ता. दौंड, जि. पुणे. यास दिनांक ०३/०१/२०२५ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.३२४/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.२८७/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) ३) कामशेत पो.ठाणे गुन्हा रजि. नं.१९९/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) अशी एकूण १,५०,०००/-कि.रूची एक यामाहा एफझेड, होंडा शाईन व अॅक्टीव्हा मोपेड अशा तिन मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तसेच देहरोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ५२८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४), ३ (५) या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन झालेले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, सुमित ताकपेरे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!