सांगवी गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी अभिलेखावरील आरोपीचे ताब्यातुन ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतुस जप्त.


अमोल कुंटे पुणे जिल्हा प्रतिनिधी

सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०९/०१/२०२५ रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवा. विवेक गायकवाड/११९४ यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर, जुनी सांगवी, पुणे येथे एक निळया रंगाची जिन्स पॅन्ट व काळी रंगाची हुडी घातलेला अंदाजे २२ ते २५ वयोगटातील एक इसम थांबला असुन त्याने कमरेला पिस्तुल लावलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली. त्यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेने सांगवी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक चक्रधर ताकभाते यांनी टीम तयार करुन सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेतले.

त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रोहित दुर्गेश धर्माधिकारी, वय २३ वर्ष, रा. कान्हु शितोळे चाळ, प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी, पुणे असे सांगितले. पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमाविरोधात पोलीसांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०८/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांनी त्याचेकडे मिळुन आलेले ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत काडतुस जप्त केले. सदर गुन्हयाचा तपास पो.उ.नि. ताकभाते हे करीत आहे. सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान पोलीसांनी त्याचेकडुन आणखी ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुस जप्त केले. अशा रितीने पोलीसांनी आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी याचेकडुन एकुण ०४ देशी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत काडतुस जप्त केले आहेत. सदर आरोपीवर यापुर्वी अवैध अग्निशस्त्र बाळगणे बाबत गुन्हा नोंद आहे. सदर पिस्टल कोणत्या कारणासाठी आणले होते याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ श्रीमती स्वप्ना गोरे, मा. सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग श्री. सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बनसोडे, पो.उ.नि. चक्रधर ताकभाते, श्रेणी पो.उ.नि. सुरेश हिंगे, सहा. फौज. शशीकांत वाघुले, पो.हवा. प्रकाश शिंदे, सचिन ढवळे, विवेक गायकवाड, प्रमोद गोडे, प्रविण पाटील व पो.शि. सुहास डंगारे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!