लोखंडी कोयती बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमावर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई..


पत्रकार :- विशाल धाकतोडे ( पुणे ग्रामीण )

उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक 16/02/2024 रोजी उरुळी कांचन पोलिसांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे गावचे हद्दीत पुणे सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टा समोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक एम एच 12 युजे 0388 या गाडीमध्ये इसम नामे 1)चंद्रशेखर दाजी चोरमुले वय 29 वर्षे सध्या राहणार माळी मळा तालुका हवेली जिल्हा पुणे व 2)आकाश मधुकर लांडगे वय 19 वर्षे राहणार उरुळी कांचन बस स्टॉप पाठीमागे तालुका हवेली जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यात बेकायदेशीर देशी बनावटीची धारदार लोखंडी कोयती बाळगले स्थितीत मिळून आल्याने त्यांना उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

सदर आरोपीतांकडून 5,00,000/- रुपये किमतीची एक लाल रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक एम एच 12 युजे 0388 व 2000/- किमतीचे दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. असा एकूण 5,02,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक ,बारामती श्री.संजय जाधव सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी ,दौंड श्री.स्वप्निल जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्य्क फौजदार प्रमोद नवले, पोलीस हवालदार रणजीत निकम, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव, पोलीस शिपाई सुदर्शन माने यांनी केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!