जेष्ठ महिलेला मारहाण करुन पैसे पळवुन नेणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट-५, गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २९/०२/२०२४ रोजी फिर्यादी ह्या गगाधाम चौक, बिबवेवाडी, पुणे येथुन पायी जात असताना अॅक्टिव्हा मोपेड गाठीवरील तीन अनोळखी इसमांनी धक्काबुक्की करुन त्याचेजवळील काळे रंगाची पर्स, व त्यामधील २५,०००/- रु रोख, इतर ऐवज जबरदस्तीने काबुन घेतला म्हणुन मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं.४२/२०२४ भा.द.वि. कलम ३९४.३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक, युनिट ०५, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -०५, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार हे मार्केटयार्ड भागात शोध घेत असताना, मिळाले बातमीवरुन इसम नामे आतिष जालींदर लांडगे वय २७ वर्षे रा. महादेव मंदिरामागे, कासेवाडी, भवानीपेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने व त्याचे मित्र असे तिघांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडून गुन्हा करणेसाठी वापरलेली ४०,०००/- रु कि.ची ऑक्टव्हा मोटार सायकल जप्त करणेत आलेली आहे.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेंद्र बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोउनि अविनाश लोहटे, पोलीस अंमलवार विनोद शिवले, अकबर शेख, प्रताप गायकवाड, रमेश साबळे, पुथ्वीराज पांडुळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, राजस शेख, शहजी काळे, राहुल वमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

