कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील संवदेनशील खुनाच्या गुन्हयातील आरोपी गुन्हे शाखा पुणे शहर कडुन जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कर्नाटक राज्य, जिल्हा कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मादन हिप्परगा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. १८/२०२४ मादवि कलम ३०२,३४ मध्ये (गुलबर्गा जिल्हयाचे एका राजकीय पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष) नामे महांतमा सिद्रामप्पा आलुरे रा. सरसांबा ता. आळप, जि. कलबुर्गी (गुलबर्गा) यांचा दि. २९/०२/२०२४ रोजी पूर्व वैमन्यस्यावरुन निर्धन खून करण्यात आलेला होता.
सदर संवेदनशील अशा गुन्ह्यातील संशयित आरोपी पुणे परीसरात असले बावत पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांना माहीती मिळालेली होती, त्यानुसार पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक, राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, सहा. पोलीस फौजदार प्रदिप शितोळे पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, तुषार मिवरकर यांची पथके नेमण्यात आलेली होती, सदर पथकाने संशयित आरोपी विषयी माहीती मिळवून पूर्ण परीसरात शोव घेत असताना गोपनिय बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मंगळवार पेट पुणे या विकाणी येणार असले बाबत माहीती मिळाल्याने सापळा रचुन संशयीत इराम नाम मयुर लक्ष्मण खेत्रे यय २६ वर्ष रा. फ्लैट नं ४ संदानंद नगर मंगळवार पेठ, पुणे, यास ताब्यात घेतले नमूद आरोपीस पुढील कारवाई कामी मादन हिप्परगा पोलीस स्टेशन तालुका आळंद, जि. गुलबर्गा राज्य कनार्टक यांचे पोलीस अधिका-यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री अविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झंडे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, यांचे मागर्दर्शानाखाली खंडणी विरोधी पश्थक २.चे, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जापय पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे संकर संपते, तुषार भिवरकर यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

