कोंढवा पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील अट्टल आरोपीस दोन वर्षासाठी केले तडीपार…


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन हद्दित्तील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी चेक करून कोणता तडीपार आरोपी हा विना परवाना चोरून पोलिस ठाणे हद्दीत राहत आहे का या बाबत माहिती घेणे बाबत सपोनी लेखाजी शिंदे व तपास पथकास आदेशित केले असता. आज दि 04/02/2024 रोजी पोलीस शि. शशांक खाडे पोलिस शि विकास मरगळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीतून तडीपार असलेला आरोपी आशिष धर्मेंद्र प्रधान वय 20 वर्ष सद्या रा साई नगर,साळवे गार्डन समोर कोंढवा पुणे मूळ रा भारती विद्यापीठ,पुणे यास मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ.02, पुणे शहर यांनी त्याचेकडील तडीपार आदेश क्र.05/2024, दिनांक. 12/02/2024, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 1951 चे कलम. 56(1)(अ)9(ब) अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले केले असताना सदर आदेशाचा भंग करुन तसेच मा.सह पोलीस आयुक्त साो.,पुणे शहर याचे मान्यतेने मा.पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी जा.क्र.पोउपआ/विशा/पुणे शहर/1753/2024, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, पुणे शहर दि.17/02/2024 रोजीच्या आदेशान्वये दि.20/02/2024 रोजी 00.01 वा पासुन दि.04/03/2024 रोजी 24.00 वा पर्येंत काढलेल्या मनाई आदेशाचा भंग करून विनापरवाना लोखंडी कोयता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने माझी त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम.142,37(1)सह 135 व भारतीय हत्यार कायदा 4(25) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

Advertisement

सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री दिनेश पाटील सहा पो निरी, पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम रोहित पाटील, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!