येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग या सारखी शिबिरे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६. समता फाऊंडेशन, लेव्हल ७. अंधरी, मुंबई या अशासकीय संस्थेमार्फत येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग या सारखी शिबिरे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करुन प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार कारागृहातील बंदी बांधवांसाठी भारत सरकाराच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे ” आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे ” ई-श्रम कार्ड” ची online नोंदणी समता फाऊंडेशन, मुंबई यांचे मार्फत येरवडा मध्यवती कारागृह येथे दि.१२.०३.२०२४ पासून सुरु करण्यात आलेला आहे.
त्यानुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील २०० बंद्यांसाठी ” आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे ” ई-श्रम कार्ड” चे वाटप दि.१५.०३.२०२४ रोजी मा. श्रीमती. किरण बेदी (सेवानिवृत्त भा.पो.से) माजी राज्यपाल, पाँडेचरी यांचे शुभहस्ते व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे “आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रालय यांचे “ई-श्रम कार्ड” ची गरज व फायदे तसेच ते वापरण्याची कार्यपध्द्ती इत्यादीची माहिती बंद्यांना देऊन अवगत करण्यात आले.
सदर उपक्रम मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमास श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्रीमती. पी. पी. कदम श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, बरोष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. शिवाजी पाटील, तुरुंगाधिकारी, श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच समता फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री. विश्वजित बागल, ऑपरेटर श्री. शरद खडसे यांनी कामकाज पाहीले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

