नागपूर मध्यवर्ती कारागृह ! E-kiosk मशीन व अॅलन स्मार्ट टेलिफोन सुविधेचा शुभारंभ…


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- दिनांक 15.03.2024 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे कारागृहातील बंदयाकरीता 02 नग e-kiosk system व सर्व बंदयांसाठी 20 नग स्मार्ट टेलिफोन चे उद्घाटन सोहळयांचे आयोजन, मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांचे प्रमुख उपस्थित व मा. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महारनिरीक्षक, मुख्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सदर सुविधेचा उद्घाटन सोहळयास मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 व मा. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महारनिरीक्षक, मुख्यालय, पुणे यांच्या विशेष ऑनलाईन उपस्थितीत होते.

सुधारणा व पुनवर्सन हे कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य असून, त्या अनुषंगाने कारागृहातील बंदयासाठी शारिरीक व मानसिक अरोग्यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच सज्ज असते. कारागृहातील बंदयांचे शिक्षा प्रकरण व न्यायाधीन बंदयांचे न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबत प्रत्यक्ष सर्कल परिसरात उभारलेल्या e-kiosk सुविधेच्या साहयाने माहिती मिळणार आहे.

e-kiosk system मुळे शिक्षाधीन व न्यायाधीन बंदयांना त्यांच्या कोर्ट ची, तारखेची, अभिवचन रजेची, संचित रजेची, उपहारगृहाची, एकंदरीतच बंदयाची संपूर्ण माहिती Biomatric म्हणजेच बंदयाच्या एका थम्ब वर त्यांना न्यायालयीन प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

Advertisement

अॅलन स्मार्ट टेलिफोन सुविधेमुळे बंदयांना आठवडयातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनीटांसाठी आपल्या नातेवाईक, वकील व कुटूबांतील सदस्याशी फोनवर बोलता येणार आहे. सदर स्मार्ट फोन सुविधेमूळे महिन्यातून 12 वेळा बंदयांना आता फोन कॉल सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आठवडयातून एक वेळा Video call ची सुविधा दिली जाणार आहे. या फोन सुविधामुळे बंदयामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.

या उद्घाटन सोहळयात बंदयाना मार्गदर्शन करताना मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी स्मार्ट फोन सुविधा व VC मुलाखत सुविधेत वाढ करण्यात आल्याने बंदयाव्दारे गैरमार्गाने बाहेरील

संपर्क साधण्याच्या कृतीला आळा बसला असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सदर फोन सुविधेचा कोणीही गैरवापर करु नये अशी सुचना देखील दिली.

तसेच कारागृहातील बंदयासाठी जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच तत्पर असते तसेच अजून आनंदाची गोष्ट सांगितली ती म्हणजे बंदयाच्या आहाराचा दर्जा सुधारून उच्च प्रतीचा आहार बंदयाना देण्यात यावा म्हणून राज्य शासनाकडे आहारा संदर्भात प्रस्ताव सादर केला असता राज्य शासनाची या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त होणार असल्याने कारागृहातील बंदयामध्ये अधिक उत्साहाचे वातावरण दिसून आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे, उपअधीक्षक श्रीमती दिपा आगे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री. आनंद पानसरे, श्री. श्रीधर काळे, श्री. सतीष कांबळे, तुरुंगाधिकारी श्री. यशवंत बनकर, श्री. विजय सोळंके, श्री. राजेद्र ठाकरे, श्री. दयावंत काळबांडे, कारागृह शिपाई श्री. प्रमोद चामट, श्री. मनीष शेंडे, श्री. सागर सुवासार, श्री. अनमोल हुमणे, श्री. पवन आत्राम, श्री. धर्मपाल शेंदरे यांनी परिश्रम घेतले.

स्वाक्षरी/


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!