निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे यांची लोणी काळभोर व परिसरात अवैध ताडी विक्री केंद्रावर धडक कारवाई.
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली दि. २०/०३/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त खात्रीलायक बातमीनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे या विभागाने लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे येथे अवैध ताडी केंद्रावर अचानक छापा घालून सदर कारवाई मध्ये ताडी ९० लि. व विक्री साहित्य असा एकूण रु. ३३५०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत अवैध ताडी विक्री करणाऱ्या बसवराज नरसय्या भंडारी या इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास दुय्यम निरीक्षक श्री. बी. जी. रेडेकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई अधीक्षक श्री. रजपूत साहेब तसेच उपअधीक्षक, श्री. शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. संजय के. कोल्हे व दुय्यम निरीक्षक श्री. ए. ए. औटे, श्री. बी. जी. रेडेकर, यांनी केली आहे. सदर कारवाईत सर्वश्री सहा. दु. नि. श्री. मोडक आणि जवान श्री. अमोल कांबळे, श्री. संतोष गायकवाड, श्री. दत्तात्रय आबनावे व महिला जवान श्रीमती प्रिया चंदनशिवे यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

