एल.एस.डी व एम.डी.एम.ए. हा अंमली पदार्थ जप्त करुन एकास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने दि.१४/१०/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे कोथरूड पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार वनाज मेट्रो स्टेशनचे प्रवेश व्दाराजवळ सार्वजनिक ठिकाणी इसम नामे तेजस सुरेश गोपाल, वय २२ वर्षे, रा. श्रीराम सोसा. फ्लॅट नं.२ लेन नं.५ डहाणूकर कॉलनी कोथरूड, पुणे मुळपत्ता रा. कोकोडी, मकरा जि. कालीकत राज्य केरळ हा संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन
१) ४८,०००/- रु.कि.चा एल.एस.डी. व एम.डी.एम.ए. हा अंमली पदार्थ
२) २,००,०००/-रू, कि, चे एमडीएमए ५० पिल्स गोळ्या हा अंमली पदार्थ
३) २०,०००/-रू.कि.चा मोबाईल
४) १,५०,०००/-रू.ची एक मोटार सायकल
असा एकूण ४,१८,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२९७/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीनकुमार नाईक, अं.प.वि.प.२. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, उदय राक्षे, दिशा खेवलकर, निलम पाटील, दिनेश साहिल शेख, नितीन बास्टेवाड यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

