जागतिक तंबाखु विरोधीदिनाचे औचित्य साधुन डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज, लोहगाव, पुणे यांचेमार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दंतरोग तपासणी व अवेरनेस कॅम्प


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे-०६.

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३१ मे २०२४ रोजी जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर दिनाचे औचित्य साधुन डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज, लोहगाव, पुणे यांचेमार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी दंतरोग तपासणी व अवेरनेस कॅम्प दि.१९.०५.२०२४ रोजी आयोजित करण्यात आला.

Advertisement

सदर शिविरामध्ये तंबाखु सेवानामुळे होणारे नुकसान आणि त्याची सवय सोडण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखु सेवनामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, यासारखी उपयुक्त माहिती दंतरोग तज्ञ डॉ. श्री. करी बसाप्पा यांनी दिली. सदर शिबिरामध्ये एकुण १५० अधिकारी / कर्मचारी यांनी सहभाग नोंदवुन दंतरोग तपासणी केली.

सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे डॉ. बी एन ढोले, उपअधीक्षक, श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. सी आर सांगळे, तु.अ.०२ श्री. व्ही. के. खराडे, सुभेदार व डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज, पुणे यांचेकडील तज्ञ चिकित्स्क यांनी कामकाज पाहीले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!