ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.१८/०५/२०२४ रोजी दुपारी १२.१० वा. चे सुमारास BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, लोखंडी रॉड व स्प्रे याचा धाक दाखवून दुकानातील अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचे तयार सोन्याचे दागीने चोरी करुन पळून गेले होते त्याप्रमाणे गुन्हा वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३५०/२०२४ भादंविक ३९५, ३९७, ३९८. भारतीय हत्यार कायदा ३(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा झाला होता.

मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांच्या सुचनेप्रमाणे व मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ व २ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट ४, ५. ६. खंडणी विरोधी पथक १ व २. दरोडा व वाहन चोरी पथक २ कढील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची १० पथके तयार करून समांतर तपास करण्यास आदेशीत केले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार थांना सदर तपासाचे दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीदारांचे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा, नमुद आरोपीतांनी केला असल्याच्या बातमीवरून आरोपी नामे १) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, रा. ए.आर.ए.आय. रोड, वसंतनगर, खडेकश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड, पुणे २) सनी ऊर्फ आदित्य राजु गांडे, वय १९ वर्षे रा. सदर ३) पियुष कल्पेश केदारी, वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३. जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा, पुणे ४) ओमकार ऊर्फ ओम्या जगन बाल्हेकर, वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरूड, पुणे ५) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, गय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज, पुणे ६) मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्ष, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लैट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी, पुणे ७) नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारंवाडा, वानवडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे,

Advertisement

सदर इसांकडे चौकशी केली असता त्यांनी इतर ०३ साथीदार यांच्या मदतीने महंमदवाडी येथील BJS ज्वेलर्स दुकानात जावुन दुकानात असलेल्या व्यक्तींना बाकु व रिव्हॉल्वरची मिती दाखवुन त्यांना मारहाण करुन त्यांचे दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन आणलेले आहे असे सांगितले,

सदर ताब्यात घेतलेल्या इसमांकडून ६०१.१५ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी व ६ मोबाईल असा एकूण ४८,३०,९१०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्तम कामगिरी केलेली आहे.

खालील नमुद ताब्यात घेतले आरोपीतांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

१) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे

२) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे सिंहगड रोड पो ठाणे गुरनं ४६०/२०२२ भादवि ३०२सिंहगड रोड पो ठाणे गुरनं ४६०/२०२२ भादवि ३०२ अन्वये कोथरूड पो ठाणे गुरनं ५९/२०२२ भादवि ३७९

३) मयुर चुन्नीलाल पटेल नारायणगाव पो ठाणे गुरनं ६८/२००१ भादवि ३०२, २०१, १२० (ब) व इतर

सदरची कारवाई मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त २, गुन्हे श्री सतीश गोवेकर, श्री सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, खंडणी विरोधी पथक २, श्री अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक २. श्री उल्हास कदम, युनिट ६, श्री क्रांतीकुमार पाटील, खंडणी विरोधी पथक १ यांचे सुचनेप्रमाणे सपोनि श्री विजयकुमार शिंदे, सपोनि शिवदास लहाने, पोउनि अविनाश लोहोटे, पोउनि श्रीकांत चव्हाण, पोउनि यशवंत ओंबासे पोलीस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, मयुर भोकरे, सयाजी चव्हाण, अशोक शेलार, अमोल सरतापे, चेतन शिरोळकर, राहूल इंगळे, विनायक येवले, सुरेद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, दिलीप गोरे, खरात, पवण भोसले, विनोद शिवले, अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, दाऊद सय्यद, माऊली गिरमकर, सुदेश सपंकाळ, सुरेश जाधव, शिरीष गोसावी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, राहूल उमढेरे, अकबर शेख, प्रविण ढमाळ, शहाजी काळे, रविंद्र फुलपगारे, अमर पवार, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!