धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून, कोंढवा परिसरातील घटना
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- धारदार हत्याराने तोंडावर व डोक्यावर वार करुन एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे . ही घटना शनिवारी (दि.18) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुलाब शेख (वय ४४, रा. कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबात पोलीस हवालदार रणजीत रंगनाथ शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यश शाम अस्वारे (वय २० रा. कोंढवा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगे महाराज शाळे समोरील मोकळ्या जागेत असलेल्या खोल्यापैकी एका खोलीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका 40 ते 45 वर्षाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे दिसून आले. पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त . राजा, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे ,सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे , पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील , सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात , सुकेशीनी जाधव , लेखाजी शिंदे , पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

