सी.सी.टी.व्ही.यंत्रणा व बंद्याकरीता संगणक प्रशिक्षण केंद्र उद्घाटन


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी मुंबई मध्यवर्ती कारागृहात कारागृह सुरक्षेकरीता 418 नग सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व बंद्याकरीता सत्संग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा.श्री.अभिताभ गुप्ता,(भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्या शुभहस्ते पार पडले. कारागृह विभागाची सुत्रे मा.श्री अभिताभ गुप्ता, भा.पो.से., यांनी हाती घेतल्या पासून कारागृहात विविध नाविन्यपुर्ण उपक्रमास सुरुवात करण्यात असून त्याअंतर्गत राज्यातील सर्वच कारागृहामध्ये मोठया प्रमाणात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सदर उपक्रमांतर्गत मुंबई मध्यवर्ती कारागृहात देखील एकुण 418 नग सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व त्यासंबंधित यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. सदर यंत्रणेच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांवर 24 तास निगराणी ठेवणे शक्य होणार आहे याचबरोबर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यास मदत होणार आहे.

 

सदर उद्घाटन शिबीराच्या प्रसंगी कारागृहात उल्लेखनीय काम करीत असलेल्या बंदी बांधावांचा मा.महोदयांचे हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सत्संग फाऊंडेशन मुंबईचे कार्यवाहक श्री.धनेश झुकर यांनी त्यांच्या संस्थेमार्फत कारागृहात सुरु करण्यात आलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाबाबत माहिती दिली व त्याचा लाभ सर्व बंदयांनी घ्यावा असे अवाहन केले.

Advertisement

 

मा.श्री योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग मुंबई यांनी कारागृहात बंदयांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी-सुविधाचा योग्य तो लाभ घ्यावा, त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री अभिताभ गुप्ता (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांनी उपस्थित बंदी बांधवांशी सुसंवाद साधुन प्रशासनाने बंद्यांना उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सोई सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.तसेच कारागृह विभागात उल्लेखनिय कामगिरीबद्दल अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नेहमीच कौतुक केले जाते. परंतु आज मुंबई मध्यवती कारागृहात उल्लेखनिय काम करणाऱ्या बंद्याचा प्रशंसापत्र देऊन गौरव केल्याबद्दल कारागृह अधीक्षकांचे कौतुक केले.

 

सदर कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कारागृह अधीक्षक श्री हर्षद अहिरराव यांनी मा.श्री.अमिताभ गुप्ता साहेब यांनी कारागृह प्रशासनाची धुरा हाती घेतल्यापासुन गेल्या एक ते दिड वर्षामध्येच कारागृहात सुरु केलेल्या ॲलन स्मार्टकार्ड दुरध्वनी, ई-मुलाखत, वॉशींग मशीन, स्मार्ट टीव्ही, वॉटर कुलर व इतर सुविधा बंदी बांधवांना उपलब्ध करुन दिलेबाबत मा.महोदयांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमास उपस्थित मा.श्री योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई व इतर मान्यवरांचे आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप केला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!