गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगीरी! मोका सारख्या गंभीर गुन्हयातील ५ महिन्यापासुन फरारी आरोपीस केले अटक “
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. वरिष्ठ साो, यांचे आदेशान्वये अगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिजे व फरारी आरोपी यांचा शोध घेणेबाबतच्या सुचना प्राप्त झाल्या असता त्या अनुषंगाने भारती विदयापिठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवा. १७८० उज्वल मोकाशी व पोहवा ६५९६ शंकर कुंभार यांना भारत्ती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी हा कात्रज तलाव येथे फिरत असून त्याने जांभळ्या रंगाचे जर्कीग व निळे रंगाची जीन्स घातलेली आहे. वगैरे बाबतची माहिती मिळाली असता सदर माहिती युनिट २ प्रभारी श्री नंदकुमार बिडवई यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावेळी सदर स्टाफला वरील वर्णनाचा इसम कात्रज तलाव भागात फिरत असताना दिसुन आला तो त्यांना पाहुन पळुन जात असताना त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारले असता प्रथम त्याने त्याचे नाव पत्ता न सांगता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला, त्यानंतर त्यांस विश्वासात घेवुन अधिक चौकशी करता त्याने त्याचे नाव आकाश ऊर्फ बटन प्रकाश कुडले ऊर्फ भांडीलकर वय २० वर्ष रा. सच्चाई माता मंदिराजवळ कात्रज पुणे असे सांगुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असलेबाबत सांगीतले. त्याप्रमाणे अभिलेखाची माहिती घेतली असता सदर आरोपी हा भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ७९८/२०२३ भादविक. ३२६,३९५,१४३,१४७,१४९,५०४ ५०६/२ क्रि. लॉ. अॅ.क.३ मोका कलम ३ (१),३ (२), ३ (४) पाहिजे आरोपी असलेबाबत माहिती मिळाली. सदर इसमास आज रोजी १६/३० वा. ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास ताब्यात घेतलेबाबत त्याचे आई रेखा प्रकाश कुडले ऊर्फ बांदीलकर रा. सदर यांना कळविण्यात आले आहे. सदर इसमास भारती विदयापिठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाई कामी वैदयकिय तपासणी करुन ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे-१, श्री सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर सपोनि अमोल रसाळ, पोहवा मोकाशी, पोहवा कुंभार, पोहवा पवार, पोहवा नेवसे, पोहवा सरडे, मपोहवा ताम्हाणे, पोहवा शेख, पोहवा कोकणे, पोअमं. चव्हाण, पोअमं राख यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

