सन्मा. श्रीमती एस.एस. भिष्म, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर भेट देवून कारागृहातील बंदीस्त असणाऱ्या बंद्यांकरीता असणाऱ्या सोईसुविधांची पाहणी करून आढावा


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 24/05/2024 रोजी चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे सन्मा. सर्वोच्च न्यायालय, NALSA तसेच MALSA यांनी Model Prison Manual 2016 व Correctional Services Act 2023 मधील तरतुदीनुसार बोर्ड ऑफ व्हिझीटर्स अंतर्गत सन्मा. श्रीमती एस.एस. भिष्म, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांचे समितीने प्रथमच भेट देवून कारागृहातील बंदीस्त असणाऱ्या बंद्यांकरीता असणाऱ्या सोईसुविधांची पाहणी करून आढावा घेतला.

सदर समितीने कारागृहातील बंद्यांकरीता असणारे स्वच्छतागृह, राहण्याची जागा, पिण्याचे पाण्याची सोय, वैयक्तिक व परिसराची स्वच्छता, वैद्यकिय सुविधा, मोफत कायदेशिर मदत व सल्ला, शैक्षणिक सुविधा व ग्रंथालय, भोजन व राशन व्यवस्था, मुलाखत, व्हिडीओ कान्फंरंन्सिग सुविधा, विशेष करून महिला बंद्यांकरीता कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधा तसेच बंद्यांच्या पुनर्वसनाकरीता राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व पुनर्वसन उपक्रमाची माहिती घेवून पाहणी केली.

Advertisement

तसेच सदर समितीचे पाहणी दरम्यान मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व मा. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, (कारागृह) पुर्व विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली या कारागृहामध्ये बंद्यांकरीता राबविण्यात येत असलेल्या विशेष सुविधा जसे की, अॅलन ग्रुप यांचे स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई-मुलाखत, ई-लायब्ररी, वॉशिग मशिन, किऑक्स मशिन, बंद्यांचे मनोरंजनाकरीता दुरदर्शन संच, इनडोअर गेम्स, बेंडींग सुविधा तसेच गरिब व गरजू बंद्यांसाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांचे माध्यमातून मोफत बेंडींग पुरविले इ. उपक्रमांचा समितीचे अध्यक्षा सन्मा. श्रीमती एस.एस. भिष्म व उपस्थित इतर सदस्यांनी विशेष कौतूक करून प्रशंसा केली.

सदर समितीचे पाहणी दरम्यान समितीचे सदस्य सन्मा. तुषार वाजे, प्रभारी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर, मा. श्री. श्रीकांत देशपांडे, अपर जिल्हाधिकारी, डॉ. श्री. महादेव चिंचोळे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय, चंद्रपूर, श्री. दिवाकर महाकाळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर, श्री. रुपेश चेंदे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 चंद्रपूर, श्री. भुषण भगत, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, चंद्रपूर तसेच कारागृहाचे अधीक्षक श्री. अनुपकुमार म. कुमरे, व इतर अधिकारी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!