श्री.डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन कोल्हापूर :- आज दिनांक 27.08.2024 रोजी मा.श्री.डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मु) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली.
मा.महोदयांनी कारागृह परिसरामध्ये वृक्षारेापन करून कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला. मा.मुख्यालयामार्फत या कारागृहास देण्यात आलेले टि.व्ही संच, ॲलन फोन, ई प्रिझन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखत करीता संगणक संच, वॉशिंग मशीन, वॉकी-टॉकी, किवॉस मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादी वस्तू कार्यान्वीत केलेल्या आहेत किंवा नाही याची पहाणी केली. तसेच ॲलन फोन, ई प्रिझन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखत या सुविधेचा लाभ कारागृहातील बंदी कशा प्रकारे घेत आहेत यांची प्रत्यक्ष पाहणी करून बंदयांच्या अडीअडचणी विचारून त्यांचे मार्गदर्शन केले.
सदर भेटी दरम्यान मा.श्री.विवेक झेंडे, अधीक्षक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, मा.श्री.पांडूरंग भुसारे, wउपअधीक्षक, श्रीमती स्मिता महाडीक, वैदयकीय अधिकारी, श्री.चंद्रशेखर देवकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी , श्रीमती शैला वाघ तुरंगाधिकारी श्रेणी-1 व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते…

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

