१ सप्टेंबर, कारागृह ध्व्जदिन निमित्त कारागृहातील सिध्ददोष बंदयांच्या किशोरवयीन मुलांकरीता कारागृहात प्रत्यक्ष भेटीचा ” गळाभेट ” कार्यक्रम “
पंकेश जाधव संपादक 7020794626
नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर
Advertisement
नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.”
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन नागपूर :- मा.श्री प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय , पुणे व मा. कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर मध्यवर्ती कारगृह,नागपूर येथे बंदी पाल्य गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. वसंतराव नाईक यांनी दिनांक ०१ सप्टेंबर १९६९ रोजी कारागृह विभागास ध्वज अर्पण केला होता. त्यादिनांचे औचित्य साधून ०१ सप्टेंबर हा कारागृह ध्वज दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने गळाभेट कार्यक्रमा अंतर्गत कारागृहातील सिध्ददोष पुरूष बंदयांच्या १८ वर्षाखालील व त्यांचे नांतवडाकरीता तसेच सिध्ददोष व न्यायाधीन महिला बंदयांचे १८ वर्षाखालील मुले व नातवंडे यांचे करिता कारागृहातच प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संबधीत न्यायालयाकडील सिध्ददोषीनंतर बंदी सदरची शिक्षा कारागृहात भोगत असता, कारागृहातील महिला व पुरूष बंदयांच्या कारागृहाबाहेरील मुलांना आपल्या माता/पित्यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा असते मातापिता त्यांच्यापासून दूर असल्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक पोकळी निर्माण झालेली असते. कारागृहातील शिक्षा बंदीची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कुटूंबातील व्यक्तीनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंदयांना आपल्या कुटूंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याच्या व कारागृह विभागाचे “सुधारणा व पुनर्वसन ” या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होणेच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्यांची १८ वर्षाखालील मुले यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक आहे, जेणेकरून समक्ष भेटीत बंदी व त्यांची मुले यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याने शिक्षणाबाबत व घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकते.
कारागृहातील बहुतांश बंदयांची संचित रजा किंवा अभिवचन रजा जाने शक्य होत नाही त्यांना आपल्या कुंटूबीयांमध्ये भेटीसाठी पाल्यांना प्रत्यक्ष भेटता न आल्याने बंदी कारागृहात नैराष्याने ग्रस्त होतात. त्याकरीता बंदयांना त्यांच्या किशोरवयीन पाल्यांची भेट व्हावी या उद्देशाने त्यांची कारागृह प्रशासनाने प्रत्यक्ष गळाभेट दर सहा महिण्यातून आयोजित करण्यात येते.
” कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. – जॉर्ज डब्ल्यू बुश ”
या कार्यक्रमात १५५ सिध्ददोष बंदयांच्या एकूण २४४ पाल्यांनी प्रत्यक्ष कारागृहात आपल्या आई वडीलांची ३० ते ४५ मिनिटे भेट घेतली. कारागृह अधीक्षक श्री. वैभव सु.आगे व उपअधीक्षक श्री. श्रीधर काळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री. आनंद पानसरे, श्री भीमराव राऊत, यांनी बंदयांच्या पाल्यांचे भेटीदरम्यान शैक्षणिक व खाजगीरित्या भेटीच्या अनुभव याबाबत पाल्यांची विचारपूरस करुन त्यांचे मनोगत विचारले.
बंदी व पाल्य यांच्या गळाभेटीनंतर कारागृहातून परत जातांना पाणावलेल्या डोळयांनी पाल्यांनी आपल्या पालकांना/आजोबांना अश्रुपूर्ण डबडबलेल्या डोळयांनी निरोप दिला. त्यामुळे भेटीप्रसंगांच्या या क्षणी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. बंदयांना गळाभेटीमध्ये आपल्या मुलांना खावू देता यावा या करीता कारागृहातील उपहारगृहा मार्फत बंदयांना संत्रा बरफी, सोनपापडी, बिस्कीट,चॉकलेट चिवडा,वेफर्स आदी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कारागृह प्रशासनाच्या वतीने बंदयांच्या पाल्यासाठी मसाला भात, सुकी बटाटा भाजी व चपाती उपलब्ध करून देण्यात आली होती. बंदयांनी आपल्या मुलांना खावू दिला तसेच त्यांच्यासोबत ही दिला.
या कार्यक्रमासाठी प्रयास सामाजिक संस्था, मुंबई या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते श्री.धनपाल मेश्राम, श्रीमती मीना लाटकर, श्री.कृष्णा पाडवी यांनी बंदयांच्या पाल्यांना गळाभेटीसाठी संपर्क करणे यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री.वैभव सु.आगे, कारागृह उपअधीक्षक श्री. श्रीधर काळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, श्री. आनंद पानसरे, श्री भीमराव राऊत, तुरूंगाधिकारी श्री. बनकर, श्री. अमोल वानखडे हे उपस्थित होते.
कार्यक्रम अल्पोहार व्यवस्था वरिष्ठ लिपीक श्री. राहूल बांबल, कार्यक्रम व्यवस्था नोंदणी यासाठी हवालदार श्री.संजय गायकवाड श्री. राजू हाते, श्री. संजय तलवारे,श्री.किशोर पडाळ, श्री.विजय रार्घोर्ते, श्री.संतोष आंबेकर, संजय जाधव, श्रीमती प्रियंका आगरे, श्रीमती वर्षा राऊत, श्रीमती पुनम सावळे, श्रीमती कला कुमरे, श्रीमती गुड्डी बाहेकर, कारागृह शिपाई, श्री.प्रमोद चामट, ,श्री. अजित मोखाडे, श्री.अनमोल हुमने, कारागृह शिक्षक श्री.लक्ष्मण साळवे, यांनी मोलाचे सहकार्य केले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

