कोथरुड पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !सराईत चोरटयाकडून लॅपटॉप सह ३ दुचाकी हस्तगत


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. ०६/०५/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा. ते १०.५० वा. दरम्यान उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड येथील धनलक्ष्मी सोसायटीचे फ्लॅटचे उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एकूण ३८,५००/- रु. कि. मुद्देमाल ( लॅपटॉप, मोबाईल, व अॅपरन) चोरी केल्याने अज्ञात चोरटयाविरुध्द कोथरुड पो. ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला.

मा. संदीप देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरटयाचा शोध घेण्याचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी सपोनि, बालाजी सानप व पो.ना. ज्ञानेश्वर मुळे, व पो.शि. तेजस चोपडे, पो.शि. आकाश वाल्मिकी यांनी घटनास्थळाचे तसेच आजु बाजुचे परिसरातील कॅमेरे चेक करून आरोपी अमित सुभाष मोरे, वय ३१ वर्षे, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पुणे यांस निष्पन्न करून आरोपीचे ताब्यातून एकुण ८०,०००/- रु. कि. मुद्देमाल त्यामध्ये (३ दुचाकी, १ लॅपटॉप,) असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीकडे केले तपासादरम्यान खालीलप्रमाणे एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Advertisement

१) कोथरुड पो. ठाणे, गुरनं १३०/२०२४ भादवि कलम ३८०

२) पाँड रोड पो. ठाणे, पुणे ग्रामीण गुरनं १९९/२०२४ भादवि कलम ३७९

३) कोथरुड पो. ठाणे, पुणे शहर गुरनं १०/२०२४ भादवि कलम ३७९

४) कोथरुड पो. ठाणे, पुणे शहर गुरनं ८८/२०२४ भादवि कलम ३७९

वरीलप्रमाणे गुन्हे तपासादरम्यान उघड झाले असून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व दुचाकी हस्तगत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त साो, श्री. संभाजी कदम यांचे अधिपत्याखाली मा. सहायक पोलीस आयुक्त साो, भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सो, संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी बालाजी सानप व पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णु राठोड, अजय शिर्के, मंगेश शेळके यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!