गुन्हे शाखा युनिट ३ ची दमदार कामगिरी ! खुनाचे गुन्हयातील आरोपीना निष्पन्न करुन ०५ आरोपींना अटक केले
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिचवड शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ०७/१०/२०२४ रोजी रात्रौ २३.०० वा. क्राईम कंट्रोल कडुन प्राप्त संदेशा प्रमाणे दिघी पोलीस ठाणे हददीत दिघी महादेवनगर येथे एका इसमावर चाकूने वार करुन खुन झालेला आहे अशी माहीती मिळाली असता सदर ठिकाणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी भेट दिली सदर ठिकाणी फिर्यादी यांचा भाउ नामे आकाश चंद्रकांत परदेशी वय २८ वर्षे रा. महादेवनगर भोसरी ता. हवेली जि. पुणे यास त्याचा मित्र कार्तिक सावे याचे मोबाईलचे पैसे आरोपी रमेश कांबळे याचेकडे मागीतले असता त्यास राग आल्याने त्याने त्याचा मित्र देवानंद कांबळे व इतर साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) यांचे मदतीने कार्तिक सावे, जयेश पटेकर व आकाश परदेशी यांना मारहाण करुन सदर मारहाणीत आकाश परदेशी मयत होवून सदर आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पळुन गेले आहेत सदर बाबत दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. ४३०/२०२४ भा. न्या. सं. कलम १०३,११८ (१),११५ (२), ३५२,३५१ (२) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार गुन्हे शाखा युनिट ३ कडील पो.हवा. ८९३ सोनवणे, पोहवा /९१९ मोरे, पो. हवा. ७५५ आढारि, पो. हवा ४७९ सानप, पोना. १८६७ साबळे, पोशि १९४० हनमंते, पोशिं २८८३ काळे, पोशिं २७१८ सूर्यवंशी, पोशिं २३५० राळे, पोशिं १२८१ कोळेकर, पोशिं २३९८ बाळसराफ, पो. हवा. १४५७ भोसुरे, पोशिं २००१ नागरे, पोशिं २८७७ मेरगळ, पोशिं २२९६ जैनक यांची तीन तपास पथके तयार करुन सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान सर्व आरोपी निष्पन्न केले.
सदर निष्पन्न आरोपींचा शोध घेणे कामी दिघी, कार्ला, लोणावळा, मंबई, नांदेड आरोपीचा शोध घेत असताना आरोपीचे नातेवाईक तसेच मित्रांकडे सखोल तपास करून वरील नमूद पथकाने गोपनिय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील निष्पन्न पाहीजे आरोपी १) सत्यजित शंकर कांबळे वय २३ वर्ष रा. सध्या महादेव नगर भोसरी, मळगाव सावळेश्वर ता. कंधार जि. नांदेड २) निखिल राजीव कांबळे वय २१ वर्षे रा. सध्या महादेव नगर भोसरी, मळगाव सावळेश्वर ता. कंधार जि. नांदेड हे तपास पथका ची दिशाभूल करण्याकरिता सारखे आपली राहण्याची ठिकाणे बदलत होती सदर आरोपींचा दिघी, कार्ला, मुंबई, संभाजीनगर असा गेले तीन दिवस सलग माग काढून त्यांना सदर टिमने संभाजीनगर येथून दिनांक १०/११/२०२४ रोजी शिताफिने ताब्यात घेवून सदर आरोपींना निष्पन्न केले आहे.
तसेच सदर गुन्हयातील इतर तीन निष्पन्न आरोपी यांना नांदेड येथे गेलेल्या तपास पथकातील अंमलदार पोहवा/१४५६ भोसुरे, पोशि/२००१ नांगरे, पोशि/२२९६ जैनक. पोशि/२८७७ मेरगळ यांनी नांदेड येथे सलग चार दिवस मुक्कामी थांबुन सदर आरोपींचा माग काढुन तसेच त्यांचे नातेवाईक तसेच मित्रांकडे सखोल चौकशी करुन सदर आरोपींचा नांदेड ते किनवड असा पाठलाग करुन आरोपी हे किनवट मार्गे तेलंगणा राज्यात पळून जाण्याचे तयारीत असताना त्यांना तेलंगणा महाराष्ट्र सिमेनजीक किनवट पोलीस ठाणे हददीतील बोदडी गावचे जंगलातून शिताफिने आरोपी नामे १) रमेश नामदेव कांबळे सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली सर्व्हे नंबर २०५/२ महादेवनगर कॉलनी क्रं. २ भोसरी मुळ रा. हडको एनडी ३१ सिध्देश्वर मंदिर जवळ ता.जि. नांदेड २) देवानंद उर्फ गौरव रमेश कांबळे सध्या सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली सर्व्हे नंबर २०५/२ महादेवनगर कॉलनी क्रं.२ भोसरी मुळ मुळ रा. हडको एनडी ३१ सिध्देश्वर मंदिर जवळ ता. जि. नांदेड ३) मानव महेंद्र कांबळे वय २१ वर्षे, सध्या रा. कोऑफ कांबळे यांची खोली सर्व्हे नंबर २०५/२ महादेवनगर कॉलनी क्रं. २ भोसरी मुळ मुळ रा. हडको एनडी ३१ सिध्देश्वर मंदिर जवळ ता. जि. नांदेड यांना ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीना पुढील कारवाईकामी दिघी पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे.
अशाप्रकारे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना गुन्हे शाखा युनिट ३ पिंपरी चिंचवड कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण समांतर तपास करुन व माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपुर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, संदिप सोनवणे, प्रदिप राळे, मनोज साबळे, ऋवीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

